अश्लील चित्रफित बनवल्याप्रकरणी अटकेत असलेल्या शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्या अटकेप्रकरणी बातम्या देताना आपली नाहक बदनामी केली, असा आरोप करत शिल्पा शेट्टी हिने तब्बल २९ प्रसारमाध्यमांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. त्यामध्ये गुगल, ट्विटर, फेसबुक आणि युट्युब या समाजमाध्यमांच्याही विरोधात शिल्पाने दावा ठोकला आहे. २५ कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्यात आला आहे.
बदनामीकारक बातम्या देण्यावर बंदी आणण्याची मागणी
शिल्पा शेट्टी हिने तिचा पती राज कुंद्रा याला अटक करण्यात आली आहे. त्यावेळी प्रसारमाध्यमांनी वार्तांकन करताना आपली बदनामी करून आपली प्रतिमा मलीन केली आहे. त्यामुळे त्याविरोधात शिल्पा शेट्टीने थेट मुंबई उच्च न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. यावर उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या याचिकेद्वारे शिल्पाने कुंद्राच्या विषयी बातम्या देताना आपली बदनामी होईल अशा बातम्या देण्यात येऊ नये, असे म्हटले आहे.
(हेही वाचा : ‘कोरोना सुपर स्प्रेडर’ म्हटले म्हणून भारतीय मॅगझिनवर चीनची बंदी!)
गुगल, फेसबुक, इंस्टाग्राम यांना बनवले प्रतिवादी
सध्या माध्यमांमध्ये याविषयी ज्या बातम्या दिल्या जात आहेत. त्या पाहता आपली प्रतिमा मलीन होत आहे. विशेष म्हणजे शिल्पा शेट्टीने फेसबुक, युट्युब, इंस्टाग्राम या समाजमाध्यमांनाही प्रतिवादी बनवले आहे. त्याचवेळी शिल्पाने तिची बदनामी करणारी वृत्ते तात्काळ हटवण्यात यावीत, अशीही मागणी केली आहे. जेव्हा कुंद्रा याला अटक करण्यात आली, तेव्हा माध्यामांनी याविषयीच्या बातम्या देताना या प्रकरणात शिल्पा शेट्टीचाही सहभाग आहे, अशा आशयाच्या बातम्या दिल्या होत्या.
Join Our WhatsApp Community