शिंदे सरकारचे शेतक-यांना मोठे गिफ्ट; राज्यात ‘मु्ख्यमंत्री किसान योजना’ होणार लागू

राज्यातील शेतक-यांना शिंदे -फडणवीस सरकारने मोठे गिफ्ट दिले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर आता राज्यातही मुख्यमंत्री किसान योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. वर्षाकाठी राज्यातील शेतक-यांना सहा हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. मागच्या तीन दिवसांपूर्वी कृषी विभागाच्या अधिका-यांसोबत घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. येत्या आर्थिक वर्षात याबाबत तरतूद केली जाणार आहे.

मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी पात्र शेतक-यांना सहा हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. राज्यातील शेतक-यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारचा हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. सध्या देशपातळीवर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवली जात आहे. आता याच पार्श्वभूमीवर राज्यातदेखील मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवण्यात येणार आहे. यानुसार प्रत्येक महिन्यात टप्प्याटप्प्याने रक्कम दिली जाणार आहे. प्रत्येक वर्षी पात्र शेतक-यांना सहा हजार रुपये दिले जाणार आहेत.

( हेही वाचा: उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर संजय राऊतांचे बंधू थेट दिल्लीला रवाना )

काय आहे योजना ?

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लहान आणि सीमांत शेतक-यांना सरकारकडून प्रत्येकी वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात. ही रक्कम प्रत्येकी दोन हजार रुपयांची असते. वर्षातून तीन वेळा शेतक-यांच्या खात्यावर दोन हजार रुपयांची रक्कम वर्ग केली जाते. वर्षातून तीनदा, दोन हजार रुपये या योजनेअंतर्गत शेतक-यांच्या खात्यावर पाठवले जातात. केंद्र सरकार हे पैसे थेट शेतक-यांच्या खात्यात वर्ग करते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here