Shinkansen E5 नावाने ओळखली जाणार भारतातील पहिली बुलेट ट्रेन

46
Shinkansen E5 नावाने ओळखली जाणार भारतातील पहिली बुलेट ट्रेन
Shinkansen E5 नावाने ओळखली जाणार भारतातील पहिली बुलेट ट्रेन

भारतातील पहिली बुलेट ट्रेन (Bullet Train) शिंकनसेन ई-५ (Shinkansen E5 ) म्हणून ओळखली जाणार आहे. शिंकनसेन (Shinkansen E5 ) नावाने ओळखल्या जाणाऱ्या जपानी बुलेट ट्रेन त्यांच्या वेग आणि कार्यक्षमतेसाठी प्रसिद्ध आहेत. या ट्रेनचा टॉप स्पीड ३५० किलोमीटर प्रतितास आहे. या बुलेट ट्रेन प्रवासावर आतापर्यंत सुमारे ६०,३७२ कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र वांरवार प्रकल्पाला होत असलेल्या विलंबामुळे खर्चाचा आकडा दोन लाख कोटी रुपयांवर जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. (Shinkansen E5 )

( हेही वाचा : भाजपाचा अपक्षांच्या बाबतीत विचार काय? Chandrashekhar Bawankule म्हणाले…

देशातील पहिली बुलेट ट्रेन (Bullet Train) अहमदाबाद ते मुंबईदरम्यान धावणार असल्याची घोषणा केंद्र सरकारने मागे केली. त्यानंतर भारत आणि जपानने २०१५ मध्ये बुलेट ट्रेन करारावर स्वाक्षरी केली. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) द्वारे संचालित या प्रकल्पाची सुरुवातीची किंमत सुमारे १.०८ लाख कोटी रुपये होती. ही बुलेट ट्रेन (Bullet Train) ताशी ३५० किलोमीटर वेगाने धावेल आणि ५०८ किलोमीटरचा पल्ला तीन तासांत पूर्ण करेल, असे सांगण्यात आले आहे. (Shinkansen E5 )

हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने २०२६ पर्यंतचे ध्येय ठेवले आहे. मात्र जपान याबद्दल ठोस मुदत देऊ शकले नाही. त्यामुळे भारत आता युरोपमधील पर्यायी पुरवठादारांकडे लक्ष देत आहे. त्यामुळेच सप्टेंबरमध्ये बुलेट ट्रेन (Bullet Train) प्रकल्पाच्या विविध घटकांसाठी जागतिक टेंडर तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यात जपानमधील शासन बदलले असून नवीन सरकार स्थापन होण्यासाठी वेळ लागेल. त्यामुळे टेंडर काढण्याचे काम रखडले आहे, असे सांगण्यात येत आहे. (Shinkansen E5 )

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.