Shirdi International Airport: शिर्डी विमानतळ जप्त होणार? काय आहे प्रकरण?

174
Shirdi International Airport: शिर्डी विमानतळ जप्त होणार? काय आहे प्रकरण?
Shirdi International Airport: शिर्डी विमानतळ जप्त होणार? काय आहे प्रकरण?

देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत देवस्थान शिर्डी आहे. यामुळे शिर्डीत (Shirdi International Airport) देशभरातून भाविक येत असतात. त्यासाठी रेल्वे स्टेशन आणि विमानतळ सुरु करण्यात आले. त्याच शिर्डीतील विमानतळाला आता नोटीस देण्यात आली आहे. आठ कोटी तीस लाखांचा कर थकल्या प्रकरणात शिर्डी विमानतळाला ही नोटीस शिर्डी ग्रामपंचायतीने बजावली आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 129 अन्वये ही नोटीस बजावण्यात आली आहे.

(हेही वाचा –Kokan Expressway: मुंबई-गोवा प्रवास आता ६ तासांवर! काय आहे ‘कोकण एक्स्प्रेस’ प्रकल्प?)

विमातळाची टर्मिनल बिल्डिंग, पेट्रोल पंप, एटीसी टॉवरसह मालमत्ता जप्तीचे वॉरंट ग्रामपंचायतीने बजावले आहे. कर जमा न केल्यास आम्ही आमच्या अधिकाराचा वापर करून जंगम मालमत्ता जप्त करणार असल्याचा इशारा सरपंच पूर्वी गुंजाळ आणि उपसरंपच भाऊसाहेब सोनवणे यांनी दिला आहे. (Shirdi International Airport)

(हेही वाचा –Delhi Police : पुणे ISIS मॉड्यूल संबंधित वाँटेड दहशतवादी रिझवान अटकेत)

शिर्डी विमानतळ हे कोपरगाव तालुक्यातील काकडी – मल्हारवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत येते. विमानतळ प्राधिकारणाने काकडी ग्रामपंचायतचा 8 कोटी 30 लाखांचा कर थकवला आहे. यामुळे ग्रामपंचायतीने शिर्डी विमानतळ प्रशासनाला जंगम मालमत्ता जप्तीचे वॉरंट बजावले आहे. 2017 पासून विमानतळ प्रशासनाकडून विविध स्वरुपातील कर थकीत आहे. अनेकदा पाठपुरावा करूनही थकबाकी जमा होत नाही. यामुळे ग्रामपंचायतीने हे पाऊल उचलले आहे. (Shirdi International Airport)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.