ठाकरे सरकारने गोर गरिबांसाठी सुरु केलेल्या शिवभोजन थाळीचे एक भयाण वास्तव समोर आले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथील शिवथाळी केंद्रात ग्राहकांना जी थाळी दिली जाते ती जेवण झाल्यावर चक्क शौचालयातील पाण्याने धुतली जात असल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
किळसवाणा प्रकार! चक्क शौचालयात धुतल्या जात आहेत शिवभोजन थाळ्या#ShivBhojan #Yavatmal #ViralVideo #Maharashtra #ShivBhojanThali pic.twitter.com/ShHZFEDmcX
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) March 29, 2022
स्वच्छतेवर प्रश्न
राज्यातील गरीब आणि गरजू नागरिकांना स्वस्त दरात भोजन उपलब्ध करुन देण्यासाठी ठाकरे सरकारने शिवभोजन योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत संपूर्ण राज्यभरात गरीब जनतेला स्वस्त दरात शिवभोजन थाळी उपलब्ध करुन दिली जात आहे. मात्र याच शिवभोजन थाळीच्या स्वच्छतेविषयी आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यवतमाळ येथील शिवभोजन केंद्रात शिवथाळ्या शौचालयात धुतल्या जात असल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे.
( हेही वाचा: महापालिका कार्यालयेही शॉकप्रुफच नाही तर फायरप्रुपही! )
काय कारवाई होणार?
हे शिवभोजन केंद्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याचे असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे सरकारच्या उद्देशाला हरताळ फासला जात आहे. अशा गलिच्छ जागेवर भांडी धुऊन त्याच थाळीत पुन्हा भोजन देत असल्याचे उघड होताच, एकप्रकारे ही गरिबांची थट्टा असल्याचे म्हटलं जात आहे. आता या शिवथाळी केंद्र चालकांवर काय कारवाई केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Join Our WhatsApp Community