शीव हिंदु स्मशानभूमी चार महिने राहणार बंद, पण विद्युत आणि पीएनजीवरील दाहिनी राहणार सुरु

132

मुंबई महानगरपालिकेच्या ‘एफ उत्तर’ विभागातील शीव (सायन) स्थित शीव हिंदू स्मशानभूमी येथील अंत्यविधीसाठी पारंपरिक लाकूड इंधनावर कार्यरत असणारी शवदाहिनी आता छताच्या पुनर्बांधणीच्या कामाकरीता बंद असणार आहे. या कामासाठी साधारण ४ महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे.

या पुनर्बांधणीच्या कालावधीत पारंपरिक पद्धतीने दहन करता येणार नाही. परंतु याच ठिकाणी पर्यावरणपूरक पद्धतीने गॅस दाहिनी व उर्जा दाहिनीवर दहन करता येईल, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कळवले आहे. तरीही, नागरिकांची गैरसोय होऊ नये, याकरिता नजीकच्या धारावी येथील कामराज शाळेसमोरील ९० फुटी रोडवरील आणि वडाळा येथील युनियन बँक जवळील गोवारी हिंदू स्मशानभूमी, प्रवेशद्वार क्रमांक ४ या स्मशानभूमींचा पर्याय उपलब्ध असल्याचे ‘एफ उत्तर’ विभाग कार्यालयाद्वारे कळविण्यात आले आहे.

(हेही वाचा केवळ सावरकरांचे पुतळे उभारून चालणार नाही, त्यांचे विचार पोहोचणे गरजेचे – रणजित सावरकर)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.