शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त शिवजयंतीच्याच (Shivjayanti 2024) दिवशी ‘दांडपट्ट्याला’ राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिली आहे.
(हेही वाचा – R Ashwin : तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी अश्विनचं कमबॅक)
किल्ले शिवनेरी येथे शासकीय कार्यक्रम –
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती (Shivjayanti 2024) १९ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात साजरी होणार आहे. दरवर्षीप्रमाणे किल्ले शिवनेरी येथे शासकीय कार्यक्रम होणार आहे.
आग्रा लाल किल्ल्यावर शिवजयंती साजरी होणार –
तर राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने ८ वाजता आग्रा लाल किल्ल्यावर शिवजयंती (Shivjayanti 2024) साजरी केली जाणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने आग्रा किल्ल्याच्या दरबारात दांडपट्टा या राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्यात येणार आहे.
(हेही वाचा – Antilia-Mansukh Hiren Case: सचिन वाझेंनी केली तुरुंगात लॅपटॉपची मागणी, विशेष न्यायालयात याचिका दाखल; कारण वाचा सविस्तर…)
ऐतिहासिक ‘दांडपट्ट्याला’ राज्यशस्त्र म्हणून मान्यता मिळणार –
आग्रा लाल किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा औरंगजेबाने भरदरबारात अपमान केला होता. त्याच दरबारात सोमवार १९ फेब्रुवारी (Shivjayanti 2024) रोजी ‘जय भवानी – जय शिवाजी’च्या घोषणांचा जयघोष होईल. तसेच शिवजयंतीच्या निमित्ताने ऐतिहासिक ‘दांडपट्ट्याला’ राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्यात येईल.
दांडपट्ट्याला’ राज्यशस्त्र म्हणून जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सांगितले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community