Shiv Pratap Din : शिवछत्रपतींच्या घोषणांच्या गजरात किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा; हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

ढोल-ताशांचा निरंतर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांनी दुमदुमलेला परिसर, रोमांच उभा करणारा तुताऱ्यांचा नाद, झांजांचा आवाज आणि हेलिकॉप्टरमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यावर झालेली पुष्पवृष्टी असा शिवप्रताप दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

256
Shiv Pratap Din : शिवछत्रपतींच्या घोषणांच्या गजरात किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा; हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
Shiv Pratap Din : शिवछत्रपतींच्या घोषणांच्या गजरात किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा; हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या घोषात मंगळवार, १९ डिसेंबर रोजी किल्ले प्रतापगडावर ‘शिवप्रताप दिन’ (Shiv Pratap Din) मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला.

(हेही वाचा – Dawood Ibrahim : हसीनाच्या मुलाने सांगितली दाऊद आणि त्याच्या भावांची पिलावळ)

अफझल खानाला संपवल्याचे स्मरण

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक घटनांचा साक्षीदार असणारा किल्ले प्रतापगड (Pratapgad) या निमित्ताने शिवमय झाला होता. याच प्रतापगडावर अफझल खानाशी (Afzal Khan) दोन हात करून छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रताप गाजवला होता. यामुळे या दिवसाला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे.

विविध कार्यक्रम सादर

ढोल-ताशांचा निरंतर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांनी दुमदुमलेला परिसर, रोमांच उभा करणारा तुताऱ्यांचा नाद, झांजांचा आवाज आणि हेलिकॉप्टरमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यावर झालेली पुष्पवृष्टी असा हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या वेळी शिवकालीन धाडसी खेळांचे अंगावर शहारे आणणारे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. या वेळी शाहीर संभाजी जाधव (Sambhaji Jadhav) आणि सहकाऱ्यांनी प्रतापगडचा रणसंग्राम हा जोशपूर्ण पोवाडा (Powada) सादर केला.

(हेही वाचा – Deonar Slaughterhouse : देवनार पशुवधगृहाचा वीज पुरवठा रामभरोसे)

मान्यवर उपस्थित

सकाळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक अदिती भारद्वाज, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात गडावरील भवानी मातेची महापूजा करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या मूर्तीची पालखीची वाजत गाजत मिरवणूक सुरु झाली. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासह सर्व उपस्थित मान्यवरांनी पालखी घेऊन मिरवणूक मार्गस्थ केली. (Shiv Pratap Din)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.