उबाठा शिवसेनेला गळती लागलेली असून आता शिवसेनेचे कट्टर असलेले पदाधिकारी आणि माजी नगरसेवक हे उद्धव ठाकरे यांना सोडून जात आहेत. गोरेगाव पूर्व येथील प्रभाग क्रमांक ५७ चे माजी नगरसेवक स्वप्नील टेंबवलकर आणि माजी नगरसेविका वर्षा टेंबवलकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून आतापर्यंत एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) मुख्य नेता असलेल्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांची संख्या २८ एवढी झाली आहे. (Shiv Sena)
०७ मार्च २०२२ रोजी महापालिका बरखास्त होईपर्यंत शिवसेनेचे एकूण ९७ नगरसेवक होते. त्यापैकी आतापर्यंत २८ माजी नगरसेवक हे एकनाथ शिंदे मुख्य नेता असलेल्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. मात्र टेंबवलकर यांच्या प्रवेशाने एक प्रकारे आमदार रवींद्र वायकर आणि सुनील प्रभू यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. टेंबवलकर कुटुंबीय हे कायम शिवसेनेतच राहिले असून एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून त्यांचे विभागात त्यांची ओळख आहे. (Shiv Sena)
उबाठा गटाचे माजी नगरसेवक स्वप्निल टेंबवलकर आणि माजी नगरसेविका वर्षा टेंबवलकर यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या वर्षा या निवासस्थानी येऊन शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. (Shiv Sena)
शिवसेनेच्या गोरेगाव विधानसभा विभागप्रमुखपदी स्वप्निल टेंबवलकर यांची नियुक्ती केल्याचे यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले. यावेळी शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे, माजी नगरसेवक राम रेपाळे तसेच पश्चिम उपनगरातील शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. (Shiv Sena)
सन २०१७ च्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत स्वप्नील टेंबवलकर हे ७८०२ मतांनी निवडून आले होते. त्यांनी भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचे बंधू विनोद शेलार यांचा पराभव केला होता. विनोद शेलार यांना ६६३५ मते मिळाली होती. विनोद शेलार यांच्यासाठी प्रभाग नसल्याने भाजपने त्यांना प्रभाग क्रमांक ५७ मध्ये उभे केले होते. स्वप्निल टेंबवलकर यांच्या पूर्वी त्याच्या पत्नी वर्षा टेंबवलकर या नगरसेविका होत्या आणि सन २००२ मध्ये स्वप्नील टेंबवलकर यांच्या मातोश्री या नगरसेविका होत्या. (Shiv Sena)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community