Banner Free Mumbai : चला करुया मुंबईला विद्रुप : शिवसेना, भाजप आणि मनसेचा मंत्र

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनंतर मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी मुंबईतील सर्व बॅनर, फलक काढण्याचे निर्देश महापालिका अधिकाऱ्यांना दिले.

143
Banner Free Mumbai : चला करुया मुंबईला विद्रुप : शिवसेना, भाजप आणि मनसेचा मंत्र
Banner Free Mumbai : चला करुया मुंबईला विद्रुप : शिवसेना, भाजप आणि मनसेचा मंत्र

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनंतर मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी मुंबईतील सर्व बॅनर, फलक काढण्याचे निर्देश महापालिका अधिकाऱ्यांना दिले. पण त्यानंतर गणेशोत्सवांमध्ये सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देणारे फलक लावत मुंबईला विद्रुप केले. परंतु गणेशोत्सवातील लावलेले फलक काढल्यानंतर पुन्हा एकदा नवरात्रोत्सवात शुभेच्छा देणारे फलक लावत मुंबईला विद्रुप केले जात आहे. यामध्ये शिवसेना, भाजप आणि मनसे हे पक्ष आघाडीवर असून मुंबईला स्वच्छ व सुंदर करण्याऐवजी मुंबईला विद्रुप करा असाच या पक्षांचा मंत्र आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Banner Free Mumbai)

New Project 2023 10 20T214710.267

मुंबईला सुंदर बनवण्याचा प्रयत्न होत असताना राजकीय पक्षांकडून मुंबईला विद्रुप करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महापालिकेला मुंबईला विद्रुप करणाऱ्या बॅनर व फलकांवर कारवाई करण्याचे निर्देश देतात, तिथे त्यांच्या पक्षाकडून अशाप्रकारे बॅनर व फलक लावले जात आहेत. गणेशोत्सवामध्ये मुंबईतील प्रत्येक रस्ता आणि चौक आदी ठिकाणी बॅनर व फलकांनी व्यापून टाकल्यानंतरही महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. परंतु गणेशोत्सवानंतर कारवाई केल्यानंतरही पुन्हा एकदा मुंबईला बॅनर आणि फलकमये दिसून आली आहे. (Banner Free Mumbai)

New Project 2023 10 20T214747.548

(हेही वाचा – South Central Railway: वाशिममार्गे नांदेड-मुंबई द्वि साप्ताहिक एक्सप्रेस धावणार, सणावारात प्रवाशांना दिलासा)

मुंबईत सध्या नवरात्रोत्सवानिमित्त शुभेच्छा देणारे फलक लावण्यात आले असून भाजपच्यावतीने मराठी गरबा तसेच गरब्यांची माहिती देणारे फलक संपूर्ण मुंबईत लावण्यात आले आहे. मुंबईत सध्या भाजपसह शिवसेना आणि मनसेचे मोठ्याप्रमाणात बॅनर व फलक लागले असून यासर्वांवर महापालिकेच्यावतीने कारवाई होत नसल्याने शिवसेना उबाठा गटासह राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचेही बॅनर व फलक मुंबईत झळकले जात आहे. त्यामुळे आयुक्तांच्या निर्देशानंतर गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सवातही बॅनर व फलक अनेक ठिकाणी झळकू लागल्याने स्वच्छ व सुंदर मुंबईला विद्रुप करण्याचा प्रयत्न करत असताना महापालिका प्रशासन आता या बॅनर व फलकांवरही कारवाई करताना दिसत नाही. (Banner Free Mumbai)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.