Balasaheb Thackeray Smriti Sthal : शिवसेनेला बाळासाहेबांचाच विसर, स्मृतीस्थळावर सर्वांनी फिरवली पाठ

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९८जयंती निमित्त दादर छत्रपती शिवाजी महाराज पार्कातील स्मृतीस्थळ फुलांनी सजवण्यात आले असले तरी प्रत्यक्षात पुण्यतिथीच्या दिवशी गर्दी करणाऱ्या शिवसैनिकांनी मंगळवारी २३ जानेवारी रोजी या स्थळाच्या दिवशी पाठ फिरवली.

323

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या ९८जयंती निमित्त दादर छत्रपती शिवाजी महाराज पार्कातील स्मृतीस्थळ फुलांनी सजवण्यात आले असले तरी प्रत्यक्षात पुण्यतिथीच्या दिवशी गर्दी करणाऱ्या शिवसैनिकांनी मंगळवारी २३ जानेवारी रोजी या स्थळाच्या दिवशी पाठ फिरवली. एरव्ही दिवसभर शिवसैनिकांची गर्दी या ठिकाणी पहायला मिळायची, तिथे जयंतीच्या दिवशी शिवसैनिकांची हजेरी बोटावर मोजण्या इतपत पहायला मिळत होती. शिवसैनिकांच्या म्हणण्यानुसार नाशिकमध्ये शिवसेनेचे राज्यव्यापी अधिवेशन असल्याने शिवसैनेचे पदाधिकारी याठिकाणी येवू शकले नाही. त्यामुळे बाळासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी स्मृतीस्थळाची वास्तू सुनी सुनी बनली होती. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेला बाळासाहेबाचा विसर पडला की काय असाही प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. (Balasaheb Thackeray Smriti Sthal)

शिवसेनाप्रमख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या ९८ व्या जन्मदिनानिमित्त २३ जानेवारी महाराष्ट्रभरासह देशातील लाखो शिवसैनिक, पदाधिकारी, शिवप्रेमी बाळासाहेबांना वंदन करण्यासाठी दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरील स्मृतीस्थळी दाखल होणार असल्याचे शिवसेना (UBT) पक्षाच्या मुखपत्रातून जाहीर करण्यात आले होते. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त या स्मृतीस्थळावर १२०० ते १५०० विविध फुलझाडांनी स्मृती स्थळ आकर्षकपणे सजवण्यात आले आहे. (Balasaheb Thackeray Smriti Sthal)

(हेही वाचा – Mira Road Naya Nagar हल्ल्यामागे दहशतवादी संघटना? हल्लेखोरांची पार्श्वभूमी तपासली जाणार)

चमकूगिरी करणाऱ्या शिवसैनिकांना विसर 

परंतु २३ जानेवारी रोजी स्मृतीस्थळावर लाल कार्पेट अंथरल्यानंतरही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा तसेच शिवसैनिकांची हजेरी तेवढी दिसून आली नाही. शिवसेनाप्रमुखांच्या पुण्यतिथी प्रमाणे जयंतीच्या दिवशीही मोठ्या संख्येने शिवसैनिक हजेरी लावत असतात. परंतु शिवसेना उबाठाचे (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह पक्षाचे नेते व पदाधिकारी हे नाशिकच्या राज्यव्यापी अधिवेशनाला गेल्याने शिवसैनिकही याठिकाणी आले नाही. एरव्ही नेत्यांसमोर दिखावूगिरी करणाऱ्या तथा चमकूगिरी करणाऱ्या शिवसैनिकांनी आपले नेतेच नसल्याने स्मृतीस्थळाच्या ठिकाणी जाणेही टाळले. त्यामुळे बाळासाहेबांवर प्रेम करणारी जनता हे स्मृती स्थळ खुले असल्याने दर्शन घेताना दिसत होती. (Balasaheb Thackeray Smriti Sthal)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.