Rahul Shewale यांना टक्कर देण्यासाठी उबाठा शिवसेना ‘या’ खासदाराला उतरवणार मैदानात

सन २०१९च्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांची युती झाली नसती तर शिवसेने विजयाची खात्री असलेला एकमेव मतदार संघ होता तो म्हणजे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघ. या मतदार संघाचे खासदार राहुल शेवाळे हे शिवसेनेत असल्याने शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसाठी एकमेव मतदार संघ सुरक्षित मानला जात आहे.

1826
Rahul Shewale यांना टक्कर देण्यासाठी उबाठा शिवसेना 'या' खासदाराला उतरवणार मैदानात

शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) मुख्यनेता असलेल्या शिवसेनेला अधिकृत मान्यता दिल्यामुळे आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षप्रमुख असलेल्या शिवसेनेने आपली पूर्ण ताकद मुंबईसह राज्यात लावण्याचा निर्धार केला. उबाठा (UBT) शिवसेनेचा मुंबई हा गड असल्याने शिवसेना भवन असलेल्या परिसरात दुसऱ्या पक्षाचा खासदार निवडून न देण्यासाठी उबाठा (UBT) शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करून विद्यमान खासदार राहुल शेवाळेंसमोर (Rahul Shewale) आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या मतदार संघावर महाविकास आघाडीच्या माध्यमातून दावा केल्यानंतर उमेदवार कोण याबाबत तर्क विर्तक लढवले जात असतानाच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या विश्वासू खासदारालाच या मतदार संघातून उतरवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे. (Rahul Shewale)

सन २०१९च्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांची युती झाली नसती तर शिवसेने विजयाची खात्री असलेला एकमेव मतदार संघ होता तो म्हणजे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघ. या मतदार संघाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) हे शिवसेनेत असल्याने शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसाठी एकमेव मतदार संघ सुरक्षित मानला जात आहे. मात्र, याच मतदार संघावर आजही शिवसेना उबाठा (UBT) पक्षाला विश्वास असून शेवाळेंना टक्कर देत आपला खासदार निवडून आणण्याची स्वप्ने ते पाहत आहे. त्यामुळे या मतदार संघातून उबाठा शिवसेनेकडून आदित्य शिरोडकर, विशाखा राऊत यांच्या नावाची चर्चा आहे, परंतु आता या मतदार संघातून शिवसेनेने नवीन पण शिवसेनेला परिचित चेहरा देण्याचा निर्णय घेतला आहे. आजवर केवळ दक्षिण मुंबईतच वर्चस्व असलेल्या या शिवसेनेच्या नेत्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा प्रचंड विश्वास आहे. आज पक्षातून सर्व सोडून जात असले तरी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा मात्र या शिवसेना नेत्यावर भारी विश्वास असून बाळासाहेब हयात असल्यापासून हा नेता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची सावली म्हणून वावरत आला आहे आणि आज हाच नेता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या महत्वाच्या निर्णयातील साक्षीदार ठरत आहे. (Rahul Shewale)

(हेही वाचा – Maharashtra Government चा अजब शासन निर्णय; महाविद्यालयांनी मतदार नोंदणी करावी, विद्यार्थ्यांना मतदान करण्याची शपथ द्यावी)

मात्र, आजवर कधीही प्रत्यक्ष निवडणुकीत उभ्या न राहिलेल्या या राज्यसभेतील सदस्याला आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दक्षिण मध्य मुंबईतून निवडणूक रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ते कामालाही लागले आहे. हे शिवसेना नेते व खासदार दुसरे तिसरे कुणी नसून खुद्द अनिल देसाई हे आहेत. मागील काही दिवसांपासून अनिल देसाई हे विभागप्रमुख महेश सावंत आणि प्रमोद शिंदे यांच्या समवेत विविध सर्व विधानसभांमधील छोट्या छोट्या वस्त्या आणि वाड्यांमध्ये फिरताना दिसत आहेत. शेवाळे (Rahul Shewale) यांच्यासमोर अनिल देसाई यांच्या रुपाने सुशिक्षित चेहरा उभा केला जात असून बऱ्याच वस्त्यांमध्ये देसाई हे आपल्या निधीतून छोट्या-मोठ्या कामांचे श्रीफळ वाढवताना दिसत आहे. मागील काळात दक्षिण मुंबईच्या बाहेर न दिसणारे अनिल देसाई हे आता दक्षिण मध्य मुंबईत फिरताना दिसत असल्याने सर्वांच्या भुवया उंचावू लागल्या आहेत. (Rahul Shewale)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.