Sambhal मध्ये तपासात सापडले शिवमंदिर, १९७८ पासून बंद असणारे मंदिर अखेर उघडले

117
Sambhal मध्ये तपासात सापडले शिवमंदिर, १९७८ पासून बंद असणारे मंदिर अखेर उघडले
Sambhal मध्ये तपासात सापडले शिवमंदिर, १९७८ पासून बंद असणारे मंदिर अखेर उघडले

संभलच्या (Sambhal) नखासा चौकात दि. १४ डिसेंबर रोजी वीजचोरीच्या प्रकरणाचा तपास वीज विभाग आणि प्रशासनाचे पथक करत होते. त्यावेळी नखासा पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोहल्ला खग्गु सराई (Mohalla Khaggu Sarai) येथे ४६ वर्षांपासून बंद असलेले शिवमंदिर (Shiva Temple) सापडले. दरम्यान प्रशासनाने हे मंदिर पुन्हा खुले केले आहे. बेकायदेशीर अतिक्रमण आणि वीजचोरीविरोधात डीएम आणि एसपींच्या संयुक्त कारवाईत हे मंदिर सापडले.

( हेही वाचा : दादरमधील हनुमान मंदिर पाडले जाणार नाही; भाजपा नेते Kirit Somaiya यांची ग्वाही

एका स्थानिकाने वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, हे मंदिर (Shiva Temple) १९७८ पासून बंद होते. मात्र मंदिर सापडल्यावर पोलिसांनी मंदिराची स्वच्छता केली. हे मंदिर सपा खासदार झिया उर रहमान बर्के (Zia Ur Rehman Burke) यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर आहे.(Sambhal)

दरम्यान नगर हिंदू सभेचे संरक्षक विष्णू शरण रस्तोगी (Vishnu Sharan Rastogi) यांनी एएनआयला सांगितले की, आम्ही खग्गु सराय भागात राहत होतो. आम्ही १९७८ पर्यंत तेथील एका घरात राहत होतो. तिथे एक शिवमंदिर होते. त्यानंतर आम्ही घर विकून गेल्यानंतर मंदिराची (Shiva Temple) काळजी आम्हाला घेता आली नाही. त्या ठिकाणी एकही पुजारी राहत नव्हता. त्यानंतर १५-२० कुटुंबियांनी हा परिसर सोडला. त्यामुळे देखभालीसाठी कोणीही नसल्याने मंदिर १९७८ पासून बंद करण्यात आले. मात्र आता पोलिसांमुळे हे मंदिर सुरु करण्यात आले आहे, असे ही रस्तोगी यांनी सांगितले.

या मंदिरात हनुमान, शिवलिंग, नंदी आणि कार्तिकेयच्या मूर्तीही आहेत. या भागातील अतिक्रमणामुळे मंदिराचा ताबा घेण्यात आला मात्र प्रशासनाने या अतिक्रमणावर कडक कारवाई करत या जागेवर बुलडोजर फिरवला ज्यामुळे मंदिराचा शोध लागला.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.