सपा नेत्याने Shiva Temple वर अतिक्रमण करून बांधले ३ मजली घर; शिवलिंग आणि मूर्ती फेकल्या विहिरीत

249
सपा नेत्याने Shiva Temple वर अतिक्रमण करून बांधले ३ मजली घर; शिवलिंग आणि मूर्ती फेकल्या विहिरीत
सपा नेत्याने Shiva Temple वर अतिक्रमण करून बांधले ३ मजली घर; शिवलिंग आणि मूर्ती फेकल्या विहिरीत

कन्नौजमधील बालापीर परिसरात २०० वर्षे जुन्या श्री जागेश्वरनाथ शिव मंदिरावर (Shiva Temple) अतिक्रमण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) (एसपी) नेते कैश खान यांनी प्राचीन जागेश्वर नाथ शिव मंदिराचा (Shiva Temple) ताबा घेऊन तीन मजली घर बांधल्याचा आरोप आहे. तसेच सपा सरकारच्या काळात मंदिरातील शिवलिंग आणि मूर्ती काढून विहिरीत टाकण्यात आल्या आणि त्याच्या वरती बांधकाम करण्यात आल्याचा दावा स्थानिक लोकांनी आणि भाजप (BJP) नेत्यांनी केला आहे.

( हेही वाचा : Air Pollution : मुंबईतील रस्ते ब्रशिंग आणि धुण्यासाठी १०० टँकरसह फौजफाटा सज्ज

वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक लोकांनी जेव्हा कैश खान यांनी केलेल्या अतिक्रमणाचा विरोध केला. तेव्हा सपा नेता कैश खान यांनी खोट्या गुन्ह्यात फसवण्याची धमकी लोकांना दिली. त्यानंतर स्थानिक रहिवाशांनी भाजपा नेत्यांकडे तक्रार केली.

माजी खासदार घटनास्थळी पोहोचले, डीएमना निवेदन दिले

भाजपचे (BJP) माजी खासदार सुब्रत पाठक (Subrat Pathak) यांच्यासह तिरवाचे आमदार कैलाश राजपूत आणि इतर कार्यकर्त्यांनी दि. २६ डिसेंबर रोजी घटनास्थळाची पाहणी केली. त्यावेळी वादग्रस्त विहिरीचे उत्खनन केल्यास त्यात शिवलिंग आणि इतर मूर्ती सापडतील, असे त्यांनी सांगितले. तसेच हा थेट हिंदू (Hindu) धर्मावर हल्ला असल्याचा आरोप त्यांनी केला. त्याचबरोबर माजी खासदार यांनी जिल्हा दंडाधिकारी (डीएम) शुभ्रांत कुमार शुक्ला यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. मंदिराची जमीन ताब्यात घेणाऱ्या सपा नेत्यावर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन डीएमनी दिले. माजी खासदार सुब्रत पाठक (Subrat Pathak) म्हणाले की, प्रशासनाने मंदिर मुक्त करण्यासाठी आणि शिवलिंगाची पुनर्स्थापना करण्याची कार्यवाही न केल्यास आम्ही कार्यकर्त्यांसह बालापीर मोहल्ला येथे आंदोलन करू.

विहिंपची अतिक्रमण मुक्त करण्याची मागणी

मंदिराची (Shiva Temple) जमीन अतिक्रमणमुक्त करावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने (Vishva Hindu Parishad) (विहिप) प्रशासनाकडे केली आहे. अशा प्रकरणांमुळे हिंदू (Hindu) समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात, असे विहिंपचे म्हणणे आहे. तर सपा नेते कैश खान यांनी आरोपांना निराधार असल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले की, जमीन खरेदी केलेली आहे. तसेच तेथील धार्मिक स्थळ आताही सुरक्षित आहेत.

भाजप नेत्यांनी एसडीएम सदर रामकेश यांच्यावर सपा नेत्याशी संगनमत केल्याचा आरोप केला आहे. माजी खासदार सुब्रत पाठक यांनी डीएमला सांगितले की, सपा नेते कैश खान यांनीही पालिकेची जमीन बळकावली आहे. तक्रारीनंतरही एसडीएमने कोणतीही कारवाई केली नाही. यानंतर कैश खान यांनी कोर्टाकडून स्थगिती घेतली. त्यामुळे एसडीएम सदर रामकेश यांचीही संगनमताने मंदिराची जमीन ताब्यात घेण्यात आली आहे. एसडीएम म्हणाले की, त्यांच्याविरोधात खोटी तक्रार करण्यात आली आहे.(Shiva Temple)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.