Uttar Pradesh मधील आणखी एका मशिदीखाली आहे शिवमंदिर

86
Uttar Pradesh मधील आणखी एका मशिदीखाली आहे शिवमंदिर
Uttar Pradesh मधील आणखी एका मशिदीखाली आहे शिवमंदिर

उत्तरप्रदेशातील (Uttar Pradesh) बदायू येथील जामा मशीद पूर्वीचे नीलकंठ महादेव मंदिर होते. या संदर्भात येथील दिवाणी न्‍यायालयातील वरिष्‍ठ विभागीय जलद गती न्‍यायालयात हिंदु महासभेकडून वर्ष २०२२ मध्‍ये याचिका प्रविष्‍ट (दाखल) करण्‍यात आली आहे. यावर ३० नोव्‍हेंबरला जामा मशीद (Jama Masjid) समितीकडून न्‍यायालयात बाजू मांडण्‍यात आली. आता ३ डिसेंबरला पुढील सुनावणी होणार आहे.

(हेही वाचा – Railway News : ‘प्लॅटफॉर्म तिकीट’ विक्री आठ दिवस बंद राहणार, काय आहे कारण ?)

आम्‍ही नीलकंठ महादेव मंदिरात पूजा करण्‍याची अनुमती मिळावी, यासाठी याचिका प्रविष्‍ट केली आहे. या प्रकरणाची सुनावणी व्‍हावी कि नाही यावर वाद चालू आहे. सरकारी अधिवक्‍त्‍यांचा युक्‍तीवाद पूर्ण झाला आहे. मुसलमानांनी त्‍यांची बाजू मांडली आहे. चर्चा संपलेली नाही. पुढील तारीख ३ डिसेंबर आहे. मुसलमानांची चर्चा संपल्‍यानंतर आम्‍ही सविस्‍तर उत्तर देऊ, असे या प्रकरणी हिंदु महासभेचे अधिवक्‍ता विवेक रांदेर यांनी म्हटले आहे.

जामा मशिदीचे अधिवक्‍ता अन्‍वर आलम म्‍हणाले की, आम्‍ही न्‍यायालयात म्‍हटले की, जामा मशिदीत कोणतेही मंदिर नाही. हिंदु महासभेला (Hindu Mahasabha) खटला प्रविष्‍ट करण्‍याचा मुळातच अधिकार नाही. त्‍यांचा दावा आहे की, येथे मंदिर पाडून मशीद बांधण्‍यात आली आहे. ही मशीद ८५० वर्षे जुनी आहे, अर्थात् तिथे मंदिर अस्‍तित्‍वात नाही.

हिंदु महासभेचे राज्‍य संयोजक मुकेश पटेल म्‍हणाले की, आम्‍ही संपूर्ण पुराव्‍यांसह न्‍यायालयात दावा केला आहे. आम्‍हाला आशा आहे की, सत्र न्‍यायालयासह उच्‍च न्‍यायालय आणि सर्वोच्‍च न्‍यायालय यांच्‍याकडून आम्‍हाला न्‍याय मिळेल. (Uttar Pradesh)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.