Shivaji Park : शिवाजी पार्कच्या स्वच्छतेसाठी मनुष्यबळाचा होणार कमी वापर, ई स्वीपिंग मशीन्सची घेणार मदत

402
Shivaji Park : शिवाजी पार्कच्या स्वच्छतेसाठी मनुष्यबळाचा होणार कमी वापर, ई स्वीपिंग मशीन्सची घेणार मदत
Shivaji Park : शिवाजी पार्कच्या स्वच्छतेसाठी मनुष्यबळाचा होणार कमी वापर, ई स्वीपिंग मशीन्सची घेणार मदत
  • सचिन धानजी,मुंबई

मुंबईतील दादर छत्रपती शिवाजी महाराज पार्क (Shivaji Park) परिसरातील स्वच्छतेकडे आता महापालिकेच्यावतीने अधिक भर दिला जात असून या परिसरातील स्वच्छतेसाठी तब्बल ५ ई स्विपिंग मशीन्सची खरेदी केली जात आहे. यासाठी खरेदी करण्यात येणाऱ्या पाच मशीन्स करता सव्वा कोटी रुपये खर्च केले जाणार असून हमी कालावधीसह पुढील सात वर्षांच्या देखभाल आणि चालवण्याचा खर्च या करता तब्बल सव्वा सहा कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. त्यामुळे एक कोटी रुपयांच्या मशीन्स करता सव्वा सात कोटींचा खर्च करण्यात येत असल्याने नक्की या मशीन्सद्वारे विभागाची स्वच्छता केली जाणार आहे की तिजोरीची असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मुंबई महापालिकेच्या (BMC) जी उत्तर विभागातील शिवाजी पार्क (Shivaji Park) परिसरात कामागारांमार्फत स्वच्छता करण्यात येत आहे. या कामासाठी एकूण ३४ कामगारांचा वापर करण्यात येत आहे. मात्र, अनेकदा कामगार सुट्टी असल्याने तसेच या भागातील कामगार पदे रिक्त असल्याने याचा परिणाम स्वच्छतेवर होत आहे. शिवाजी पार्क (Shivaji Park) परिसर उत्कृष्टरित्या स्वछ करण्यासाठी आधुनिक उपकरणे तथा संयंत्र वापरणे गरजेचे असून या परिसराकरता ५ वॉक बिहाइंड ई-स्वीपर मशीन्सची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

(हेही वाचा – Vidhanasabha Election 2024 : विदर्भातील ठाकरे गटाच्या एकमेव आमदाराविरोधात महायुतीत कोणाला उमेदवारी मिळणार?)

वॉक बिहाइंड ई स्वीपर मशीन्स या आधुनिक असून याच्या माध्यमातून आकाराने लहान आहेत. तसेच रस्ते, पदपथ आणि अवघड जागांची स्वछता चांगल्या प्रकारे करता येते,असे घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सात वर्षांच्या प्रचालन आणि परिरक्षणाच्या कालावधीसाठी पाच मशीन्सची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, या ई स्वीपिंग मशीन्सची निविदा मागवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये पाच मशीन्सच्या खरेदी १ कोटी ११ लाख ८६ हजार खर्च केले जाणार आहे. तर पुढील सात वर्षांच्या प्रचलन आणि देखभाल आदींकता ६ कोटी १८ लाख २३ हजार ८६४ रुपयांचा खर्च अशाप्रकारे ७ कोटी ८० लाख २४ हजार रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. या कामांसाठी लक्ष्य एंटरप्रायझेस ही कंपनी पात्र ठरली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.