Shivaji Park मधील लाल मातीच्या समस्या निवारणाबाबत महापालिकेचे निवृत्त अधिकारी काय म्हणाले?

332
Shivaji Park मधील लाल मातीच्या समस्या निवारणाबाबत महापालिकेचे निवृत्त अधिकारी काय म्हणाले?
  • सचिन धानजी, मुंबई

दादर छत्रपती शिवाजी महाराज मैदान अर्थात शिवाजी पार्कमधील (Shivaji Park) लाल मातीबाबत आयआयटी मुंबई काय निष्कर्ष काढून  निर्णय देतात याकडे सर्वांचे लक्ष असले तरी प्रत्यक्षात या मैदानावरील लाल माती कायम ठेवून यावरील हिरवळ कायम ठेवता येऊ शकते असे महापालिकेच्या निवृत्त अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. या मैदानावर हिरवळ राखण्यासाठी किमान एक महिना मैदान बंद ठेवावे आणि या मैदानावर राजकीय सभांना बंदी घालून त्याचा वापर क्रिकेटसह इतर खेळांसाठीच केल्यास लाल मातीचा प्रश्न निकाली निघू शकतो, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

दादर छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरील (Shivaji Park) लाल मातीच्या प्रश्नाबाबत क्रिकेट खेळाडू आणि महापालिकेचे निवृत्त सहायक आयुक्तांनी, लाल मातीच्या प्रश्नाबाबत आयआयटीची मदत घेण्याऐवजी आणि लाल माती न काढताही येथील मैदानावरील समस्या दूर करता येईल असे म्हटले आहे. या मैदानावर पूर्वी लाल मातीमुळे उडणाऱ्या धुळीची समस्या २० टक्केच होती, परंतु आता लाल माती टाकल्यामुळे ही समस्या १०० टक्के निर्माण झाली आहे.

(हेही वाचा – Bangladesh–India तणाव वाढला; पराष्ट्र मंत्रालयाने वरिष्ठ राजदूताला बजावले समन्स)

या मैदानावर जेव्हा लाल माती टाकण्यात आली होती, तेव्हा माती टाकताना स्थानिकांना त्रास झाला होता, परंतु यामुळे काहीतरी चांगले हाईल आणि समस्या दूर होईल याच भावनेने लोकांनी विरोध केला नाही. परंतु आता ही समस्या निर्माण झाल्याने स्थानिकांचा विरोध वाढला आहे. पण जर माती काढायची झाल्यास यामुळे लोकांना त्रास झाल्यास तेही लोक सहन करतील, कारण ही माती काढल्यामुळे दिलासा मिळेल ही त्यामागील भावना असेल. (Shivaji Park)

परंतु या निवृत्त सहायक आयुक्तांच्या म्हणण्यानुसार मी जेव्हा सहायक आयुक्त होता, तेव्हा या मैदानावरील उडणाऱ्या धुळीचा अभ्यास करत होतो आणि  उद्यानात काम करणाऱ्या माळींची मदत घेऊन ही समस्या दूर केली जाणार होती, यासाठी गवत निर्माण करून ठिंबक सिंचनद्वारे हा हरित पट्टा कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार होता, परंतु नेमकी त्याच वेळी माझी बदली झाली, अन्यथा शिवाजी पार्कमधील (Shivaji Park) मैदान हरित दिसून आले असते.

(हेही वाचा – New Districts In Maharashtra : महाराष्ट्रात नवीन जिल्ह्यांमुळे विधानसभा व लोकसभा मतदारसंघ वाढणार; राजकीय बदलाची तयारी)

या निवृत्त सहायक आयुक्तांच्या म्हणण्यानुसार, या मैदानातील लाल माती न काढताही आता हिरवळ राखता येईल. हे मैदान (Shivaji Park) एक महिन्यांसाठी बंद ठेवून त्यामध्ये गवत उगवले जाईल. परंतु हे गवत उगवताना ज्याप्रमाणे सिजन बॉलच्या क्रिकेट क्लबसाठी पिच बनवण्यात आली आहेत, त्याच धर्तीवर टेनिस बॉलसाठी पिच तयार केल्यास त्या पिचचा वापर होईल आणि उर्वरीत खेळपट्टीचा भाग हिरवळ राखता येईल. त्यामुळे शिवाजीपार्कमध्ये विहिरींचे पाणी उपलब्ध असल्याने  ठिंबक सिंचन अर्थात स्प्रिंकर्सद्वारे हा हरित पट्टा कायम ठेवण्यात येईल, असे त्यांचे म्हणणे आहे.

मात्र, शिवाजीपार्कचे मैदान हे फक्त खेळासाठीच ठेवले जावे, यावर राजकीय पक्षांच्या सभा बंद व्हाव्यात. या मैदानावर राजकीय सभांना बंदी घातल्यास हे मैदान खेळण्यासाठीच राहिल्यास त्यावर हिरवळ कायम राहिल आणि स्थानिकांना होणारा लाल मातीचा त्रास कमी होईल, असेही त्यांचे म्हणणे आहे. (Shivaji Park)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.