मराठी समाज उत्तर प्रदेश संस्थेने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त राजधानी लखनऊमध्ये शोभा यात्रेसाठी परवानगी मागितली होती. ही परवानगी देण्यात पोलिसांनी आडकाठी आणली. मात्र तरीही आग्रा किल्ल्यात शोभा यात्रा काढण्यासाठी परवाणगी देण्यात आली आहे. आग्रा येथील स्थानिक संघटनांनी ही परवानगी मागितली होती.
लखनऊ पोलिसांचा हा अजब कारभार आहे. योगी आदित्यनाथ यांच्या सत्तेत छत्रपती शिवाजी महाराज यांची शोभा यात्रा काढण्यासाठी पोलीस आडकाठी आणत होते. पोलीस कायदेशीर मु्द्दे उपस्थित करत परवानगी नाकारण्याचे कारस्थान रचत होते. तरीही आग्रा येथे शोभा यात्रेला परवानगी देण्यात आली. आग्रा किल्ला परिसरात शिवजयंती साजरी करण्यास अखेर पुरातत्व खात्याने परवानगी दिली आहे. आग्रा येथील राष्ट्राभिमानी संघटनांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. लखनऊ येथे अनेक दशकांपासून स्थायिक असलेले मराठी नागरिक पोलिसांच्या प्रती नाराज आहे.
(हेही वाचा गृहकर्जाचे हप्ते थकले तरी काळजी करू नका; कारण…)
पोलीस सह आयुक्त पीयुष मोर्डिया यांच्या हस्ते जारी केलेल्या पत्रानुसार, १९ फेब्रुवारी २०२३ रोजी शोभा यात्रेला परवानगी देण्यात आली. त्याचवेळी यासंबंधी अन्य विभाग आणि संस्था यांच्याकडून परवानगी घेण्याची आवश्यकता वाटली, तेव्हा त्याआधारावर परवानगी रद्द करण्यात आली. आग्रा किल्ला भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अंतर्गत येतो. इथे अन्य कार्यक्रमांना परवानगी आधीच दिली जाते. मात्र शिवरायांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यास नकार दिला. त्यामुळे अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचे विनोद पाटील यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्याचा परिणाम सकारात्मक झाला आणि पुरातत्व विभागाने किल्ल्यातील दिवान-ए-आम येथे शिवजयंती साजरी करण्यासाठी परवानगी दिली.
Join Our WhatsApp Community