Shivjayanti 2024 : व्हिडीओ शेअर करून पंतप्रधानांनी दिल्या शिवजयंतीच्या शुभेच्छा

दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी शिवनेरी किल्ल्यावर हजेरी लावत महाराजांचा पाळणा हलवला.

225
Shivjayanti 2024 : व्हिडीओ शेअर करून पंतप्रधानांनी दिल्या शिवजयंतीच्या शुभेच्छा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४९व्या जयंतीनिमित्त (Shivjayanti 2024) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली. एक्स (पूर्वीचे ट्विटर) वरील एका पोस्टमध्ये पंतप्रधानांनी एक व्हिडिओ शेअर केला. ज्यामधून महाराजांच्या इतिहासाचे आणि शौर्याचे महत्त्व उलगडले आहे.

पंतप्रधान मोदींच्या व्हिडिओमध्ये एनिमेशन, व्हिज्युअल रेकॉर्डिंग आणि अयोध्या राम मंदिराच्या उद्घाटनाच्या क्लिप्सचा समावेश आहे.

(हेही वाचा – Shiv Jayanti 2024 : शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी महाराजांचा पाळणा हलवला)

काय म्हणाले पंतप्रधान मोदी ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त (Shivjayanti 2024) अभिवादन केलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. यामध्ये “छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. दूरदर्शी नेते, निर्भीड योद्धे, संस्कृतीचे रक्षक आणि सुशासनाचे मूर्त रूप, त्यांचे जीवन अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे” असं मोदींनी म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी एक खास व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी शिवनेरी किल्ल्यावर हजेरी लावत महाराजांचा (Shivjayanti 2024) पाळणा हलवला.

(हेही वाचा – Farmer Protest : खलिस्तानी दहशतवादी पन्नू आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना म्हणतो, पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यासाठी करतारपूर बॉर्डरवर ठेवलीत शस्त्रे)

तर केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) नेते अमित शहा यांनीही हा एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर शिवजयंती निमित्त पोस्ट केली आहे.

महाराजांनी हिंदू साम्राज्याचा भक्कम पाया रचला – अमित शहा

‘शौर्य, आणि आत्मसन्मानाचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या जयंतीनिमित्त (Shivjayanti 2024) अभिवादन. भारतीय संस्कृती आणि स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी मुघल आणि इतर परदेशी शक्तींविरुद्ध लढा दिला. आपल्या अद्भुत लढाऊ कौशल्याने आणि अदम्य शौर्याने आक्रमणकर्त्यांना गुडघे टेकण्यास भाग पाडणाऱ्या शिवाजी महाराजांनी हिंदू साम्राज्याचा भक्कम पाया रचला. छत्रपती शिवाजी महाराजांची संस्कृतीप्रती असलेली अतूट भक्ती आणि महिलांप्रती असलेल्या सन्मानाची तत्त्वे आजही आपल्याला प्रेरणा देतात.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.