Shivjayanti 2025 : शिवनेरी किल्ल्यावर साजरा झाला शिवजन्मोत्सवाचा सोहळा; मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित

143

छत्रपती शिवाजी महाराज यांची १९ फेब्रुवारी या दिवशी ३९५ वी जयंती साजरी होत आहे. राज्यभरात शिवजयंती (Shivjayanti 2025) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. या दिवशी शिवनेरी (Shivneri) किल्ल्यावर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या हस्ते शिवजन्माचा पाळणा जोजावण्यात आला.

(हेही वाचा – Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : PM Narendra Modi यांनी खास मराठीतून ट्विट करत महाराजांना केले अभिवादन)

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचे जन्मस्थान असलेल्या पुण्यातील (Pune) किल्ले शिवनेरीवर शासकीय सोहळा संपन्न झाला. पारंपारिक पद्धतीने शिवजन्माचा पाळणा जोजावल्यानंतर उपस्थित महिलांनी बाळाचे नाव ठेवले शिवाजी, शिवाजी, शिवाजी…असे सांगितले. यानंतर शिवनेरी किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणेने दणाणून गेला.

लहान चिमुकल्यांनी या वेळी साहसी क्रीडा प्रकारांचे सादरीकरण केले. शिवजयंतीच्या उत्साहाने शिवजन्मस्थान, शिवकुंज, शिवाईदेवी मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. शिवनेरी किल्ल्यावरील दरवाजांना फुलांची तोरणे लावण्यात आली आहे.

किल्ल्यांवरील अतिक्रमण हटवणार – मुख्यमंत्र्यांचा निर्धार

जगभरातील शिवप्रेमींना छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा. आजपासून पाच वर्षांनी छत्रपती शिवरायांचा ४००वा जन्मोत्सव आपण साजरा करणार आहोत. शिवनेरीवरती आल्यावर आपल्याला जी स्वराज्याची स्फूर्ती मिळते ते घेऊन महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी आम्ही सर्व लोक येथे येत असतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) शिवनेरी किल्ल्यावर आयोजित कार्यक्रमात बोलताना म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज केवळ एक योद्धा नव्हते, तर एक चांगले प्रशासक देखील होते. आम्ही त्यांच्या सर्व किल्ल्यांचा विकास करू. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्व किल्ल्यांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी एक टास्क फोर्स स्थापन केली आहे, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.