क्रूरकर्मा अफझल खानाचा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी कोथळा बाहेर काढून यवनांची झोप मोडली होती. तो दिवस प्रतापगडावर दरवर्षी शिवप्रताप दिन (Shivpratap Din) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ढोल ताशांचा गजर, महाराजांचा जयजयकार आणि हेलिकॉप्टरमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी सोबतीला शिवकालीन धाडशी खेळांची प्रात्यक्षिके आशा वातावरणात प्रतापगडावर शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
(हेही वाचा AIMIM चे आमदार म्हणतात, लातूरमधील १०३ शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी Waqf Board ला परत कराव्या लागतील)
भवानी मातेच्या मंदिरासमोर ध्वजस्तंभाचे मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करुन शिवशाहीचे प्रतीक असणाऱ्या भगव्य ध्वजाचे रोहन करण्यात आले. त्यावेळी ढोल, तुताऱ्या, लेझीम यांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला. आई भवानीच्या आरतीनंतर मानाच्या पालखीची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली. पालखीचे शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याजवळ आगमन झाल्यावर पुतळ्यास व पालखीस पुष्प अर्पण करुन भक्तिभावे पूजन करण्यात आले. यावेळी ‘क्षत्रिय कुलावतंस, राजाधिराज….,’ या ललकारींने, शिवरायांच्या जयजयकाराच्या घोषणांनी वातावरण भारुन गेले होते. मान्यवरांच्या हस्ते शिवपुतळ्यासमोरील चबुतऱ्यावरील भगव्याचे ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर सातारा पोलिस दलाच्या बॅण्ड पथकाने विविध धून वाजवून मानवंदना दिली. शाहीर सुरज जाधव आणि सहकाऱ्यांनी प्रतापगडचा रणसंग्राम हा जोशपूर्ण पोवाडा सादर केला. छावा युवा मंचचे अध्यक्ष उदय यादव यांनी लहान मोठ्या विद्यार्थ्यांसह लाठी काठी, तलवारबाजी, दांडपट्टा, कुऱ्हाडबाजी, अग्निचक्र, गनिमीकावा आदी ऐतिहासिक खेळांची डोळ्यांचे पारणे फेडणारी प्रात्यक्षिके सादर केली. (Shivpratap Din)
Join Our WhatsApp Community