किल्ले रायगडावर १९ जूनपासून Shivrajyabhishek Din सोहळा

240
किल्ले रायगडावर १९ जूनपासून Shivrajyabhishek Din सोहळा

छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५१ वा श्री शिवराज्याभिषेक दिन (Shivrajyabhishek Din) सोहळा (हिंदू साम्राज्य दिन) ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या तिथीला १९ व २० जून या कालावधीत किल्ले रायगडावर जल्लोषात साजरा केला जाणार आहे, अशी माहिती श्रीशिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड अध्यक्ष सुनील पवार यांनी दिली आहे. (Shivrajyabhishek Din)

(हेही वाचा – Delhi Airport वर सुरू झाली ‘एसएसबीडी’ सुविधा, फायदे काय आणि कसा कराल वापर ? जाणून घ्या…)

या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरतशेठ गोगोवले, संलग्न सर्व संस्था आणि त्यांचे प्रतिनिधी आहेत. यानिमित्त बुधवारी, १९ जून रोजी सकाळी ९ वाजता श्री गडदेवता शिर्काईपूजन, १० वाजता श्री छत्रपती शंभू महाराज जयंती उत्सव, शंभुराईपूजन, शंभू व्याख्यान, दुपारी १२.३० वाजता श्री जगदीश्वरपूजन, श्री व्याडेश्वरपूजन, श्री भवानीदेवीपूजन आणि अभिषेक, सायंकाळी ५ वाजता श्री शिवतुलादान विधी, ६ वाजता पारंपरिक गोंधळ, रात्री ९.३० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, श्री शिवराज्याभिषेक दिन गुरुवारी सकाळी ७ वाजता ध्वजवंदन सोहळा, सुवर्ण होन, शिवराईपूजन, १०.३० वाजता श्री शिवसन्मान सोहळा, ११ वाजता शिव पालखी, ११.३० वाजता महाप्रसाद, दुपारी २ वाजता गड स्वच्छता आणि सांगता होणार आहे. या सोहळ्याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन समितीचे अध्यक्ष सुनील पवार, सनी ताठेले, समीर वारेकर, राजू देसाई, संलग्न सर्व संस्था आणि त्यांच्या प्रतिनिधींनी केले आहे. (Shivrajyabhishek Din)

दरम्यान, शिवराज्याभिषेक दिन म्हणजे शिवप्रेमींसाठी एक उत्सवच असतो. त्यामुळेच श्रीशिवराज्याभिषेक दिनोत्सव (Shivrajyabhishek Din) सेवा समिती, दुर्गराज रायगड दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करते. यामुळे छत्रपती शिवरायांच्या कार्याची महती राज्यभरात पोहचवली जाते. या कार्यक्रमातील उत्साह नवचेतना देणारा असतो. यामुळे शिवप्रेमींनी या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष पवार यांनी केले आहे. (Shivrajyabhishek Din)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.