बुधवारी, २३ जून रोजी रायगडावर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी हिंदू तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कोरोनाचे सर्व नियम पाळून ५० जणांच्या उपस्थितीत ३४८वा शिवराज्याभिषेक दिन साजरा करताना शिवरायांच्या मूर्तीची विधिवत पूजा करण्यात आली. शिवरायांचा हा शिवराज्याभिषेक दिन हिंदू तिथीनुसार साजरा केला जात आहे. त्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ५ लाख रुपयांचा निधी शिवराज्याभिषेकोत्सव दिन समितीकडे सुपूर्द केला.
बुधवारी, २३ जून रोजी रायगडावर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी हिंदू तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिनोत्सव समितीच्या वतीने ३४८वा शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कोरोनाचे सर्व नियम पाळून ५० जणांच्या उपस्थितीत शिवरायांच्या मूर्तीची विधिवत पूजा करण्यात आली. pic.twitter.com/LKRhEuuZnJ
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) June 23, 2021
कोरोना संसर्गामुळे केवळ ५० शिवप्रेमींची उपस्थिती!
मराठी माणसाला अभिमान वाटावा असा हा नेत्रदीपक सोहळा पाहण्याकरता दरवर्षी हजारोंच्या संख्येने शिवप्रेमी हे रायगडावर उपस्थित राहतात. मात्र यंदाच्या वर्षी कोरोनाचा संसर्ग वाढल्याने रायगडावर केवळ ५० शिवप्रेमी रायगडावर उपस्थित होते. या फार मोजक्या शिवप्रेमींच्या सोबतीने आमदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा करण्यात आला. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी हिंदू तिथीप्रमाणे होणाऱ्या राज्याभिषेकाला ५ लाख रुपयांचा निधी जाहीर केला असून ती रक्कम शिवराज्याभिषेकोत्सव दिन समितीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. तसेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी दरवर्षी ही रक्कम समितीला देणार आहेत. शिवराज्याभिषेक दिनोत्सव समितीचे अध्यक्ष सुनील पवार यांनी यासंबंधी माहिती देताना सांगितले कि, हिंदू तिथीप्रमाणे साजरा होणारा हा शिवराज्याभिषेक सोहळा पाहण्याची इच्छा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी ते रायगडावर येणार आहेत, असेही पवार म्हणाले.
(हेही वाचा : संदीप देशपांडेंचा विरप्पन गँगबद्दल गौप्यस्फोट आणि धक्कादायक खुलासे)
Join Our WhatsApp Community