किल्ले रायगडावर (Raigad) आज (६ जून) ३५१ वा शिवराज्याभिषेक सोहळा (Shivrajyabhishek Sohala) साजरा होत आहे. यानिमित्त हजारो शिवभक्त रायगडावर दाखल झाले आहेत. शिवभक्तांसाठी रायगड जिल्हा प्रशासनाने सोयी-सुविधांची सज्जता केली आहे. तसेच, या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलिस फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे. प्रेरणा आणि ऊर्जेचा स्रोत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) चरणी नतमस्तक होण्यासाठी शिवप्रेमींनी सकाळपासूनच दुर्गराज रायगडावर मोठी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. (Shivrajyabhishek Sohala)
(हेही वाचा –Lok Sabha Elections : ‘ईव्हीएम’चा मुद्दा गेला बासनात!)
प्रशिक्षित ट्रेकर्स सज्ज
शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी (Shivrajyabhishek Sohala) येणाऱ्या शिवभक्तांची संख्या दर वर्षी वाढत असल्याने त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. प्रशस्त पार्किंगपासून एसटी बस, दिशादर्शक फलक आणि मदतीसाठी स्वयंसेवक तयार ठेवण्यात आले आहेत. पायरीमार्गे गडावर जाणाऱ्या शिवभक्तांच्या सुविधेसाठी प्रशिक्षित ट्रेकर्स सज्ज असणार आहेत. रुग्णांवर आपत्कालीन उपचारांसाठी डॉक्टर व वैद्यकीय उपचार केंद्र उभारण्यात आले आहे. (Shivrajyabhishek Sohala)
जागोजागी पिण्याच्या पाण्याची व विश्रांतीची व्यवस्था
सर्पदंश किंवा विंचूदंशापासून सुरक्षितेसाठी सर्पमित्र नियुक्त करण्यात आले आहेत. उष्णतेचा विचार करता गड परिसरात जागोजागी पिण्याच्या पाण्याची व विश्रांतीची व्यवस्था करण्यात आली आहे. गडावर विशेष सांस्कृतिक कार्यक्रम व भोजनव्यवस्था असून, शिवराज्याभिषेक सोहळ्याचे (Shivrajyabhishek Sohala) प्रक्षेपण सर्व वाहिन्या व सोशल मीडियावर उपलब्ध करण्यात येणार आहे. गड परिसरात एलपीडी स्क्रीन लावण्यात येणार आहेत. (Shivrajyabhishek Sohala)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community