वर्षभरातील ठरवून दिलेले ३० दिवस हे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (शिवाजी पार्क) येथे विविध कार्यक्रमासाठी वापरले जाणार आहे. या व्यतिरिक्त हे मैदान केवळ खेळासाठीच वापरले जाईल, अशी ठाम भूमिका राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात मांडली. तसे प्रतिज्ञापत्र ठाकरे सरकारने सादर केले होते. विशेष म्हणजे हे प्रतिज्ञापत्र भाजप-शिवसेना सरकारच्या काळात दाखल करण्यात आले. उच्च न्यायालयात राज्य सरकारने मांडलेल्या या भूमिकेमुळे शिवाजी पार्कमध्ये गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे शिवाजी पार्कात स्मृतीस्थळ उभारण्यामध्ये कायदेशीररीत्या अडचणी येणार आहेत.
शिवाजी पार्क ३० दिवस वगळता इतर कारणांसाठी वापरण्यास परवानगी
शिवाजी पार्क मैदान खेळाव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीसाठी परवानगी देऊ नये, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली. हे मैदान मनोरंजन मैदान आहे की नाही, असाही मुद्दा पुढे आला. अखेर वर्षांतून ३० दिवस हे मैदान खेळा व्यतिरिक्त वापरण्यास परवानगी असल्याचे प्रतिज्ञापत्र राज्य शासनाने सादर केले. या ३० दिवसांत दसरा मेळावा, मनसेचा गुढी पाढवानिमित्त होणारा मेळावा यांचाही समावेश करण्यात आला. काही दिवस प्रशासनाने स्वत:साठी विशेष अधिकार म्हणून राखून ठेवले आहेत. म्हणून एखादा शासकीय कार्यक्रम मैदानावर घ्यायचा असल्यास तो विशेष अधिकारात घेण्याची तरतूद आहे. अशी परिस्थिती असताना त्यातच भाजप आमदार राम कदम, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवाजी पार्क मैदानात लता दीदींचे स्मारक उभारणीची मागणी केल्यानंतर अनेक मतभेद सुरू झाले. यामध्ये क्रीडा संघटक आणि क्रीडाप्रेमींमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.
(हेही वाचा लता मंगेशकरांच्या अस्थींचे रामकुंडावर विधिवत विसर्जन)
खेळाशिवाय कोणत्या कारणासाठी वापरता येणार शिवाजी पार्क
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन, नौदल दिन, १ मे व २६ जानेवारी हे दिवस वगळून इतर दिवशी शिवाजी पार्क मैदान खेळण्यासाठी वापरले जाईल. या ३० दिवसांमध्ये दसरा मेळावा, मनसेचा गुढी पाडव्यानिमित्त होणारा मेळावा यांचाही समावेश करण्यात आला. एखादा शासकीय कार्यक्रम मैदानावर घ्यायचा असल्यास तो विशेष अधिकारात घेण्याची तरतूद आहे.
Join Our WhatsApp Community