शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर

97

महापौर आयोजित माझी मुंबई या संकल्पनेवर आधारीत जागतिक किर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुह्दयसम्राअ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा २०२२-२३चा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये इयत्ता पहिली ते दुसरीच्या गट क्रमांक १मध्ये परळमधील बीईस प्रायमरी स्कूलचा अनिकेत मंडल, इयत्ता ३ री ते ५वीच्या गट क्रमांक दोनमध्ये त्याच शाळेची सोनिया डोलुई, इयत्ता ६ वी ते ८ वीच्या गट क्रमांक ३मध्ये घाटकोपरमधील फातिमा हायस्कूलची श्रावणी साटेलकर आणि इयत्ता ९ वी ते १०वीच्या गट क्रमांक ४मध्ये परळ शिरोडकर शाळेची सानिका सदाशिव पाटील या विद्यार्थ्यांचे प्रथम क्रमांक आले आहे.

( हेही वाचा : मुंबईकरांना दिलासा! CNG अडीच रुपयांनी स्वस्त, ८७ रुपये प्रतिकिलो दराने मिळणार)

जागतिक किर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त महापालिका शिक्षण विभागाच्यावतीने बालचित्रकला स्पर्धा चार गटांमध्ये आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये चारही गटांमध्ये एकूण ७७ हजार ४५३ विद्यार्थी सहभागी झाले होते. ८ जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या या स्पर्धेसाठी चारही गटांमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिकासह प्रत्येक गटांमध्ये उत्तेजनार्थ १० पारितोषिक आणि प्रत्येक गटात ५ उत्तम चित्रे याप्रमाणे प्रती वॉर्ड २० याप्रमाणे याप्रमाणे एकूण ५५२ पारितोषिक जाहीर करण्यात आली आहे. या प्रत्येक गटातील चि़त्रकलेचा अंतिम निकाल महापालिका उपायुक्त केशब उबाळे यांनी जाहीर केला. याप्रसंगी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजू तडवी, उपशिक्षणाधिकारी सुजाता खरे, प्राचार्य कला दिनकर पवार आदी उपस्थित होते.

गट क्रमांक १( इयत्ता पहिली व दुसरी)

  • प्रथम पारितोषिक (२५ हजार रुपये):अनिकेत मंडल, ,बीईएस प्रायमरी स्कूल, एफ दक्षिण
  • द्वितीय पारितोषिक( २०हजार रुपये) : आज्ञा हिरवे, एसएसआर वि एम, मुलुंड टी वॉर्ड
  • तृत्तीय पारितोषिक (१५ हजार रुपये):मोमीन सिद्रा फरहान,गैबन शाह स्कूल, कुर्ला एल विभाग

गट क्रमांक २ ( इयत्ता तिसरी ते पाचवी)

  • प्रथम पारितोषिक (२५ हजार रुपये): सोनिया डोलुई, बीईएस हायस्कूल, एफ दक्षिण
  • द्वितीय पारितोषिक( २०हजार रुपये) : स्वरा एन गुरव, सेंट कोलंबिया स्कूल, डि विभाग
  • तृत्तीय पारितोषिक (१५ हजार रुपये): शौर्या मानकर, सेंट मेरी कॉन्वेंट हायस्कूल, मुलुंड टी वॉर्ड

गट क्रमांक ३( इयत्ता सहावी ते आठवी)

  • प्रथम पारितोषिक (२५ हजार रुपये): श्रीवणी सत्यवान साटेलकर, फातिमा हायस्कूल, घाटकोपर एन विभाग
  • द्वितीय पारितोषिक( २०हजार रुपये) : हर्ष संदीप चव्हाण, आईएस न्यू इंग्लिश स्कूल, एच पूर्व विभाग
  • तृत्तीय पारितोषिक (१५ हजार रुपये): रागणी चंद्रमोहन जैसवार, एमपीएस धारावी काळा किल्ला, जी उत्तर विभाग

गट क्रमांक ४( इयत्ता नववी व दहावी)

  • प्रथम पारितोषिक (२५ हजार रुपये): सानिका सदाशिव पाटील, केएमएस डॉ शिरोडकर हायस्कूल,एफ दक्षिण
  • द्वितीय पारितोषिक( २०हजार रुपये) : सई धनंजय कदम, चेंबूर कर्नाटक हायस्कूल, एम पश्चिम
  • तृत्तीय पारितोषिक (१५ हजार रुपये): तनिष्क आर मुणगेकर, आईएस न्यू इंग्लीश स्कूल, एच पूर्व
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.