Shivshahi Bus Breakdown : सतत अपघात होणाऱ्या शिवशाही बसची तपासणी सुरु

70
Shivshahi Bus Breakdown : सतत अपघात होणाऱ्या शिवशाही बसची तपासणी सुरु
Shivshahi Bus Breakdown : सतत अपघात होणाऱ्या शिवशाही बसची तपासणी सुरु

काही दिवसांपासून राज्यातील विविध विभाग शिवशाही प्रकारातील एसटी बसच्या अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सातत्याने होणारे अपघात आणि बिघाड लक्षात घेता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या ताफ्यातील सर्व शिवशाही बसगाड्यांची विशेष तपासणी विशेष अधिकार्‍यांकडून करण्यात येणार आहे. या तपासणीचा अहवाल चार जानेवारीपर्यंत सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे. (Shivshahi Bus Breakdown)

(हेही वाचा – लहान मुलांच्या Mobile वापरावर निर्बंध आणण्याचा ‘या’ समाजाचा निर्णय; शाळांमध्ये जनजागृती करणार)

दरम्यान, राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात सध्या ७९२ शिवशाही बसगाड्या आहेत. महामंडळाने आठ वर्षांपूर्वी या शिवशाही बस भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत. वारंवार होणारे बिघाड आणि अपघात यांमुळे प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे. बसमधील वातानुकूलन यंत्रणा बंद असणे, सीट कव्हर फाटलेले असणे आणि पडदे अस्वच्छ असणे यांमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. वातानुकूलित बसच्या नावाखाली जास्त पैसे घेऊनही चांगल्या सुविधा दिल्या जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे वाढते अपघात आणि तक्रारींच्या अनुषंगाने महामंडळाने प्रत्येक विभागातील शिवशाहींची विशेष तपासणी करण्याचे आदेश सर्व विभागप्रमुखांना दिले आहेत.

शिवशाही बसगाड्यांच्या अपघातांचे चिंताजनक प्रमाण

जून २०१७ ते ऑक्टोबर २०१९ या कालावधीत शिवशाहीचे एकूण ५५० अपघात झाले. जून २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत ८३ अपघात, तर या अपघातांत ७ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ६७ जण घायाळ झाले आहेत. एप्रिल २०१८ ते ऑक्टोबर २०१९ या कालावधीत शिवशाही बसगाड्यांचे ४४२ अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये ४३ जणांचा मृत्यू झाला, तर ३०० जण घायाळ झाले. (Shivshahi Bus Breakdown)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.