हवेचा दाब कमी होताच आपोआप उघडतो दरवाजा; Shivshahi च्या त्रुटी आल्या समोर

77

एस.टी. महामंडळातील  (ST. corporation) शिवशाही बसच्या अनेक दुर्घटना संबंधी घटना तुम्ही ऐकल्या किंवा वाचल्या असतील. पण स्वारगेट येथे झालेल्या माहिला अत्याचार संबंधी शिवशाही बसच्या चालकाने तांत्रिक त्रुटीबद्दल सोलापूर आगाराचे चालक शंकर लालू चव्हाण यांनी ‘ही’ माहीती दिली. (Shivshahi)  

शिवशाही बस (Shivshahi Bus) सुरू असताना ब्रेक आणि दरवाजा हवेच्या दाबावर काम करतो. बस बंद होताच एक तासाच्या आत हवेचा दाब (Shivshahi Bus Door Air Pressure) कमी झाल्यानंतर बसचा दरवाजा ‘अनलॉक’ होतो. पुण्यात स्वारगेट येथे झालेल्या अत्याचार प्रकरणातील नराधमाने या तांत्रिक त्रुटीचा फायदा उचलला. संबंधित बस ही सोलापूर आगाराची आहे. त्या बसचालकाकडून माहिती घेतली असता त्याने शिवशाही बसचे सत्य समोर आले.

(हेही वाचा – “शक्ती” कायदा महाराष्ट्रात कधी अंमलात आणणार? – माजी गृहमंत्री Anil Deshmukh)

सोलापूर आगाराचे (Solapur ST Bus Stand) चालक शंकर लालू चव्हाण हे मंगळवारी २५ फेब्रुवारीला रात्री पावणेदहाची सोलापूर-स्वारगेट (एम. एच. ०६ बी डब्ल्यू ०३१९) ही बस घेऊन पुण्याकडे गेले. स्वारगेट स्थानकावर बुधवारी २६ फेब्रुवारीला पहाटे तीन वाजून ४५ मिनिटांनी ही बस पोचली. बस बाजुला उभी करून चव्हाण हे सोलापूर आगारासाठी असलेल्या विश्रामकक्षात जाऊन झोपले. सकाळी दहा वाजता स्वारगेट बसस्थानकावरील सुरक्षारक्षकांनी त्यांना झोपेतून जागे केले आणि एसटीच्या अधिकाऱ्याने त्यांच्याकडून जबाब लिहून घेतला. तोपर्यंत त्यांना घडलेल्या घटनेबद्दल काहीही माहीत नव्हते.

‘शिवशाही’ बस ही वातानुकूलित बस आहे. हवेच्या दाबाचे बटन सोलापूर येथील बस स्थानकात दरवाजा उघडा असलेली बस. दाबल्यानंतर दरवाजा उघडतो आणि बंद होतो. ही यंत्रणा बस सुरू असताना सुरळीत चालते. मात्र, बस बंद झाल्यानंतर हवेचा दाब उतरतो. त्यानंतर दरवाजा कोणीही उघडू अथवा बंद करू शकतो. यामुळे एक तासानंतर ही बस ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशा परिस्थितीत येते. याच तांत्रिक त्रुटीचा (Shivshahi Bus technical issue) फायदा संबंधित नराधमाने उचलला, असे चालकाने सांगितले.

(हेही वाचा – Universal Pension Scheme : असंघटित क्षेत्र, बांधकाम कामगार, गिग कामगारांसाठी एकीकृत पेन्शन योजना)

विनाथांबा बस सोलापूर-स्वारगेट ही बस विनाथांबा आहे. या गाडीचे आरक्षण सोलापूरमधून तसेच मोहोळ, टेंभुर्णी येथून होते. या गाडीत वाहक नसतो. फक्त चालकच ही गाडी घेऊन जातात. यामुळे चव्हाण हे एकटेच ही गाडी घेऊन गेले होते. दरम्यान, संबंधित बस पंचनाम्यासाठी पुणे येथेच असून चालक सोलापूरला आले आहेत.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.