शिवशाहिरांनी पंतप्रधानांकडे ‘ही’ इच्छा केली व्यक्त!

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवरायांचे विचार समाजात पोहचवून सर्वांना जागृत केले, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांना त्यांच्या वयाच्या शतकपूर्तीनिमित्ताने दूरदृश्य माध्यमातून शुभेच्छा दिल्या. 

83

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्राच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास समोर आणला. त्यांचे विचार, शौर्यगाथा घराघरात पोहचवली. बाबासाहेबांसारख्या महान प्रभुतींमुळे इतिहास जिंवत आहे, त्यांच्या अव्दितीय कार्याला वंदन आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. त्यावेळी बाबासाहेब पुरंदरे यांनी, ‘संपूर्ण आयुष्य महाराजांचे विचार मला जाणून घेता आले, ते आत्मसात करुन जगता आले. याचा आपल्याला आनंद होत आहे. पुण्यात जर माझ्या डोळ्यांसमोर शिवसृष्टी पूर्ण झाली, तर मी आनंदी होईन आणि हा ठेवा नव्या पिढीपर्यंत पोहचवल्याचे मला भाग्य मिळेल’, अशी इच्छा व्यक्त केली.

सर्व क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छा! 

पुण्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शताब्दी वर्षाला तिथीनुसार सुरुवात झाली आहे. त्यानिमित्ताने विशेष गौरव सोहळ्याचे आयोजन कात्रज येथील शिवसृष्टी परिसरात करण्यात आले होते. यावेळी लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन, खासदार विनय सहस्त्रबुध्दे, जगदीश कदम उपस्थित होते. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते बाबासाहेबांना कवड्याची माळ, फुलांचा हार आणि पगडी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महिलांनी शंभर दिव्यांनी त्याचे औक्षण केले. दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सचिन तेंडुलकर, सरसंघचालक मोहन भागवत यांनी ऑनलाईन शुभेच्छा दिल्या, तर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, खासदार उदयनराजे यांनीही पत्र स्वरुपात शुभेच्छा दिल्या.

pur

(हेही वाचा : बाबासाहेबांना खंत वाटावी असे लंडनमध्ये काय घडले होते? माहीत आहे का?)

बाबासाहेबांनी व्यक्त केली इच्छा! 

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे कार्य पाहता त्यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय सांस्कृतिक विभागातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यावर जो कोणी व्यक्ती संशोधन करेल. याकरता शिष्यवृत्ती म्हणून अठरा लाख रुपये दिले जातील, असे खासदार विनय सहस्त्रबुध्दे यांनी यावेळी जाहीर केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यातून प्रेरित होऊन आजच्या तरुण पिढीने महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेला पाहिजे. बाबासाहेबांनी अदभुत असे कार्य करुन ठेवले असून त्यांच्या या कार्याचे कौतुक करावे तितके थोडे आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवरायांचे विचार समाजात पोहचवून सर्वांना जागृत केले, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांना त्यांच्या शतकपूर्तीनिमित्ताने दूरदृश्य माध्यमातून शुभेच्छा दिल्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.