रायगड (Raigad) जिल्ह्यात माणगाव पोलिसांनी मोठी कारवाई केला आहे. पोलिसांनी 1500 किलो जिवंत जिलेटिन (live gelatin) आणि 70 किलो डिटोनेटर (detonators) हस्तगत केले आहेत. मोठ्या प्रमाणात हस्तगत करण्यात आलेल्या या स्फोटकांच्या साठ्यामुळे रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. (Detonators Seized in Raigad)
(हेही वाचा – Uniform Civil Code : उत्तराखंडमध्ये पुढील महिन्यात लागू होणार समान नागरी कायदा)
स्फोटकांची टेम्पोतून वाहतूक
जिलेटीन (live gelatin) आणि डेटोनेटरची (detonators) बेकायदेशीर वाहतूक करणारा टेम्पो माणगाव पोलिसांनी पकडला आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी आतापर्यंत ३ जणांना अटक केली आहे. आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.
३ जणांना अटक
जप्त करण्यात आलेले 1500 किलो जिवंत जिलेटिन आणि 70 किलो डिटोनेटर यांची टेंपोतून बेकायदेशीर वाहतूक करण्यात येत होती. माणगाव (Mangaon Police) पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत ३ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. ही स्फोटके पुण्यातून (Pune) रायगडमध्ये (Raigad) आणत असतांना ही कारवाई करण्यात आली आहे.
(हेही वाचा – स्वच्छतेचा मुंबई पॅटर्न राज्यातील सर्व शहरांमध्ये राबवणार; CM Eknath Shinde यांची घोषणा)
रायगडमधील समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजले
जोडून सुट्ट्या आल्यामुळे पर्यटकांची पावले कोकणाकडे (beaches in konkan) वळू लागली आहेत. मुंबई, पुण्यातील पर्यटक कोकणच्या समुद्र किना-यांकडे सुट्टी व्यतीत करण्यासाठी जात आहेत. मुंबई-पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या रायगडला (Raigad) पर्यटकांची पहिली पसंती असते. त्यामुळे रायगडमधील समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजले आहेत. अशा स्थितीत माणगाव पोलिसांनी ही कारवाई केल्यामुळे पर्यटकही धास्तावले आहेत. (Detonators Seized in Raigad)
हेही पहा –