धक्कादायक! सुनेने पतीच्या मदतीने सासूची केली हत्या!

सासू बेबी शिंदे हिच्या सोबत आरोपी सून पूजा शिंदे हिचे घरगुती कारणामुळे वाद होत होते, म्हणून त्याचा राग मनात धरून आरोपी पूजा हिने ब्लाऊजच्या सहाय्याने सासूचा गळा आवळून तिचा खून केला.

107

पिंपरी-चिंचवड शहरात सूनेन सासूचा गळा आवळून हत्या करणारी धक्कादायक घटना घडली आहे. हत्या केल्यानंतर मृतदेह पोत्यात भरून झुडुपात फेकून देण्यात आला. मृतदेह नेतानाची घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याने संबधित प्रकार उघडकीस आला. त्यामुळे तळेगाव दाभाडे पोलिसांनी घटनेतील आरोपी सून आणि मुलाला अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी घडली असून आरोपींना काल उशिरा रात्री अटक करण्यात आली आहे.

कौटुंबिक वादातून केला खून!

बेबी गौतम शिंदे (वय 50 वर्ष) असे खून झालेल्या सासूचे नाव आहे. पूजा मिलिंद शिंदे (वय 22) व मिलिंद गौतम शिंदे (वय 29) असे या प्रकरणातील आरोपी सून व मुलाचे नाव आहे. अमित गौतम शिंदे (वय 22) यांनी या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक भास्कर जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सासू बेबी शिंदे हिच्या सोबत आरोपी सून पूजा शिंदे हिचे घरगुती कारणामुळे वाद होत होते, म्हणून त्याचा राग मनात धरून आरोपी पूजा हिने ब्लाऊजच्या सहाय्याने सासूचा गळा आवळून तिचा खून केला. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पोत्यामध्ये घालून प्रथम टेरेसवर ठेवला व नंतर काही अंतरावरील बंगल्याशेजारील प्लॉटमधील झुडपात नेऊन टाकून दिला. तसेच टेरेसवर व सोसायटीचे पाय-यावर पडलेले रक्त आरोपी मिलिंद शिंदे याने धुऊन-पुसून पुरावा नष्ट केला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता पोलिसांना एक सीसीटीव्ही हाती लागला आणि प्रकरणाचा उलगडा या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नारायण पाटील करत आहेत.

(हेही वाचा : मुंबईकरांनो, आणखी काही दिवस लोकल प्रवास विसरा! )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.