Sion Hospital : मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) हद्दीत असलेल्या आरोग्य यंत्रणाची अक्षरक्ष: तीन-तेरा वाजले आहेत. चांगल्या उपचार पद्धतीसाठी उभारण्यात आलेल्या या रुग्णालयात रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. मात्र पालिकेच्या सायन रुग्णालयात (Sion Hospital) दोन वरिष्ठ डॉक्टरांच्या भांडणात सायन रुग्णालयात एका ८७ वयोवृद्धाला तब्बल २४ तास स्ट्रेचरवर आणि ६ तास उपचाराविना ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. रुग्णावर उपचार कोणी करायचे यावरून म्हणे दोन्ही डॉक्टरांत जुंपली आणि तोपर्यंत आयसीयुचा हा रुग्ण मात्र स्ट्रेचरवरच ठेवण्यात आल्याची घटना सायन रुग्णालयात घडली आहे. (Sion Hospital)
(हेही वाचा – IndusInd Bank Share Price : इंडसइंड बँकेच्या शेअरमध्ये २७ टक्क्यांची घसरण का झाली?)
सोलापुरच्या अकलुज (Solapur Akluj) तालुक्यात राहणारे ८७ वर्षीय बाळु कटके (Balu Katke) यांचा गेल्या ११ फेब्रुवारीला अपघात झाला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना अकलुजच्या अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शस्त्रक्रियेनंतर २३ दिवस होऊनही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना ७ मार्च रोजी आय.सी.यू. मधून काढून मोबाईल व्हॅनने सायन रुग्णालयात आणले. सहा तासाचा प्रवास करून आल्यानंतर रुग्णाला तात्काळ आयसीयुमध्ये घेतील असे सोबतच्या कुटुंबियांना वाटले. मात्र आपत्कालीन विभागातील डॉक्टरने रुग्णासहीत नातेवाईकांना ओरडून बाहेर बाहेर काढले. काही वेळाने ट्रॉमा केअर सेंटरमध्ये त्यांचे सर्व केस पेपर पाहिल्यानंतर डॉ. परेश यांनी न्युरो विभागाच्या प्रमुखांना माहिती दिली. मात्र खासगी रुग्णालयातील रुग्णांना दाखल करुन घ्यायचे नाही, असा अधिष्ठांचा आदेश असल्याचे कारण देत त्यांना दाखल करून घेतले नाही. सर्जरी विभाग प्रमुख डॉ. सेठना यांनी देखील हीच भूमिका घेतली. या दोघांच्या वादात सहा तास गेले. आजोबा स्ट्रेचरवर पडून होते. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी (Sion Hospital Dean Dr. Mohan Joshi), वैद्यकीय अधिकारी डॉ. रणधीर सिंग यांनी वारंवार दोन्ही डॉक्टरांना विनंती केली तरी ते ऐकत नव्हते. ट्रॉमाचे डॉ. परेश यांनी तर रुग्णांच्या नातेवाईकांना आधीच सांगून टाकले की रुग्ण ८७ वर्षांचे असल्याने त्यांना वाचविण्याची शाश्वती देता येणार नाही. तुम्हाला माझी कुठे तक्रार करायची ते करा मला काहीच फरक पडत नाही. बाळू कटके उपचारांच्याच प्रतीक्षेत होते. ट्रॉमाचे डॉक्टर अधिष्ठातांकडे लेखी मागत होते. अखेर त्यांनी लेखी देतो रुग्णास दाखल करुन घ्या असे सांगितले आणि बाळू कटके यांना दाखल करुन घेण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता त्यांना बेड मिळाला.
(हेही वाचा – High Speed Internet : अतीजलद इंटरनेटसाठी एअरटेल, जिओचा स्टारलिंकशी करार)
अधिष्ठाता डॉ. जोशी म्हणाले की, न्यूरो सर्जरी व सर्जरी या दोन विभागांचा संबंध असल्याने उपचारास विलंब झाला. रुग्णालयात जागा देखील नव्हती. वाद घालणाऱ्या डॉक्टरांची नावे माहित नसल्याचे ते म्हणाले. डॉ. प्रकाश, डॉ. सेठना, डॉ. परेश, डॉ पंकीत यांच्यावर कारवाई होईल का? असा सवाल उपस्थित करत डॉक्टरांवर कठोर कारवाईची मागणी केली.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community