राज्यातील वीज संकट काही नवे नाही. मागच्या अनेक दिवसांपासून राज्यात वीजेची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. सरकारने यावर तोडगा काढत वीज खरेदीचा पर्याय जरी निवडला असला, तरी वीजेचा तुटवडा असल्याने लोड शेडींगचा मार्ग आता सरकारने अवलंबला आहे. सामान्य नागरिकांची ऐन उन्हाळ्यात गैरसोय होतेच आहे, पण आता मात्र रायगड जिल्ह्यातील तब्बल दीड हजार शाळांची वीज कापल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वीज बील न भरल्याने या शाळांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांवर ऐन उन्हाळ्यात शाळेत पंख्याविना शिक्षण घेण्याची वेळ आली आहे.
कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित
या शाळांची जवळपास 50 लाखांची वीज बिलांची थकबाकी आहे. त्यामुळे वीज वितरण विभागाने या शाळांचा वीज पुरवठाच खंडित केला आहे. सध्या अनेक शाळांमध्ये वीज उपलब्ध नाही. तसेच, समोर आलेल्या आकडेवारीनुसार 679 शाळांचा विद्युतपुरवठा कायमस्वरुपी बंद करण्यात आला आहे. तर, 870 शाळांवर तात्पुरती वीज तोडणीची कारवाई करण्यात आली आहे.
( हेही वाचा: खाद्यतेल महागाईचा ग्राहकांवर परिणाम; इतके भारतीय वळले कमी दर्ज्याच्या खाद्यतेलाकडे )
विद्यार्थ्यांसमोर नवे आव्हान
आधीच कोरोनाच्या संकटानंतर दोन वर्षांनी शाळा सुरु झाल्या आहेत आणि त्यातच शाळांसमोर वीजेचे हे नवे आणि मोठे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे शिक्षण विभाग आता यावर काय तोडगा काढणार हे पाहावे लागणार आहे.
Join Our WhatsApp Community