‘या’ धरणाचे पाणी पित असाल, तर…सावधान! ‘हे’ धरण सर्वाधिक प्रदूषित

164

पुणे, नगर, सोलापूर या जिल्ह्यांसाठी वरदान ठरलेल्या धरणाच्या पाण्याची शुद्धता बरीच घटली आहे. ती इतकी घटली आहे की, यामुळे स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे या पाण्याच्या वापराविषयी आता साशंकता निर्माण झाली आहे.

उजनी धरणातील जलप्रदूषणाच्या पातळीने कमाल मर्यादा ओलांडली आहे. सध्या उजनीच्या पाण्यावर हिरव्या गर्द रंगाचा तवंग दिसून येत असून, या दूषित पाण्याचा मोठा फटका उजनी लगतच्या शेतकऱ्यांना बसत आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्याचा रंग प्रदूषणामुळे हिरवा झाला आहे. या दुषित पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट

पळसदेव (ता. इंदापूर) येथील अनेक शेतकऱ्यांनी विहिरींच्या पाण्यावर पिकविलेल्या उसाच्या तुलनेत, उजनी नदीच्या पाण्यावर पिकविलेल्या उसाच्या एकरी उत्पादनात २० टनांपर्यंत घट होत असल्याचे अनुभवले आहे. यामुळे या जलप्रदूषणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पाण्यात अंग भिजले तर, त्वचेच्या समस्या उद्भवतात, असे मत स्थानिक मच्छीमारांनी व्यक्त केले आहे. तसेच अनेक स्थलांतरीत पक्ष्यांनीही यंदा या परिसराकडे पाठ फिरवली आहे.

( हेही वाचा : शेतक-यांचा ऐतिहासिक विजय; पेप्सिको कंपनीचे बटाट्याचे पेटंट रद्द )

आर्थिक नुकसान होण्याची शक्यता

प्रदूषित पाण्यामुळे धरणातील अनेक जलचरांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे मासेमारी करणाऱ्या व्यावसायिकांचे व्यवसाय अडचणीत आल्याचे स्थानिक मच्छीमारांनी स्पष्ट केले आहे. उजनीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्यांवर जलप्रदुषणाचे मोठे संकट घोंघावत असल्याने जलप्रदुषणामुळे अर्थकारणास खीळ बसण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.