Congress Supporting Hamas : इस्रायलच्या पंतप्रधानांना गोळीने उडवा; केरळमध्ये काँग्रेसकडून पुन्हा हमासचे समर्थन

'हमासविरुद्ध युद्धासाठी इस्रायलचे बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) हेच जबाबदार आहेत. त्यांना सरळ गोळी घालून उडवा. त्यांच्या विरुद्ध कोणतीही कायदेशीर कारवाई करत बसू नका. नेत्यान्याहू यांना गोळ्या घाला', असे वक्तव्य खासदार राजमोहन उन्नीथन यांनी केले आहे.

106
Congress Supporting Hamas : इस्रायलच्या पंतप्रधानांना गोळीने उडवा; केरळमध्ये काँग्रेसकडून पुन्हा हमासचे समर्थन
Congress Supporting Hamas : इस्रायलच्या पंतप्रधानांना गोळीने उडवा; केरळमध्ये काँग्रेसकडून पुन्हा हमासचे समर्थन

हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलने (Israel) आक्रमक भूमिका घेतली आहे. (Congress Supporting Hamas) गाझा पट्टीत हमासच्या  दहशतवाद्यांविरुद्ध युद्ध चालूच आहे. भारताने अधिकृत भूमिका म्हणून इस्रायलचे समर्थन केले आहे. असे असूनही देशात अनेक ठिकाणी हमासचे उघड उघड समर्थन केले आहे. काही दिवसांपूर्वी केरळ येथे हमासच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात आली होती. आता युनायटेड मुस्लिम संघटनेने आयोजित केलेल्या हमास समर्थन रॅलीत काँग्रेसचे खासदार राजमोहन उन्नीथन (Rajmohan unnithan MP) यांनी उन्मत्त वक्तव्य केले आहे. (Congress Supporting Hamas)

(हेही वाचा – Golden Jackal: सांगलीतील ऊस कामगारांच्या वसाहतीत शिरला सोनेरी कोल्हा)

‘हमासविरुद्ध युद्धासाठी इस्रायलचे बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) हेच जबाबदार आहेत. त्यांना सरळ गोळी घालून उडवा. त्यांच्या विरुद्ध कोणतीही कायदेशीर कारवाई करत बसू नका. नेत्यान्याहू यांना गोळ्या घाला’, असे वक्तव्य खासदार राजमोहन उन्नीथन यांनी केले आहे. पॅलेस्टाईनला समर्थन देण्यासाठी केरळमधील कासारगोड येथे आयोजित सभेला संबोधित करताना काँग्रेस खासदार राजमोहन उन्नीथन यांनी हे वक्तव्य केले. कासारगोड युनायटेड मुस्लीम संघटनांकडून शुक्रवारी या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. (Congress Supporting Hamas)

खासदार उन्नीथन म्हणाले की, ज्यांनी जिनिव्हा करारांतर्गत सर्व करार मोडले त्यांचे काय केले पाहिजे ?? दुसऱ्या महायुद्धानंतर युद्ध गुन्ह्यातील दोषींना न्याय मिळवून देण्यासाठी न्युरेमबर्ग ट्रायल नावाची गोष्ट होती. खटला न चालवता गुन्ह्यांची अंमलबजावणी केली जात होती. आता वेळ आली आहे की, इस्रायलच्या पंतप्रधानांविरुद्ध न्युरेमबर्ग मॉडेल लागू केले गेले पाहिजे. आज बेंजामिन नेतान्याहू हे युद्ध गुन्हेगार म्हणून जगासमोर उभे आहेत. आता नेतन्याहू यांना गोळ्या घालून ठार मारण्याची वेळ आली आहे.

(हेही वाचा – Chhagan Bhujbal : भारत जिंकणार, आनंद लुटा, बाकी सगळं डोक्यातून काढून टाका)

लाजिरवाणे विधान – केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन

काँग्रेस खासदाराच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन म्हणाले की, खासदाराच्या अशा वक्तव्यांमुळे देशाची प्रतिमा मलिन होत आहे. काँग्रेस पक्षाची आपल्या खासदाराच्या अशा विधानांवर काय भूमिका आहे हे मला माहिती नाही. संसद सदस्य हे एक अतिशय जबाबदार पद आहे, ज्याकडे आंतरराष्ट्रीय समुदाय लक्ष देतो. एखादा खासदार अशी विधाने करतो, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. (Congress Supporting Hamas)

काँग्रेस कोणत्या दिशेने जात आहे – भाजपचा प्रश्न 

यावर केरळ भाजपचे (BJP) अध्यक्ष के सुरेंद्रन म्हणाले, ”काँग्रेस कोणत्या दिशेने जात आहे?? आपण एका आंतरराष्ट्रीय गुन्ह्याला प्रोत्साहन देतात तिथून देत आहोत याचे भानही काँग्रेस खासदाराला राहिले नाही काँग्रेसचे नेते अशी उन्मत्त वक्तव्ये करून स्वतःच्याच पक्षाला खड्ड्यात घालत आहे.” (Congress Supporting Hamas)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.