आता YouTube Shorts ने करता येणार शाॅपिंग; ही आहे कंपनीची भन्नाट सुविधा

लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रिमिंग प्लॅटफाॅर्म YouTube आपल्या प्लॅटफाॅर्मवर एक नवीन आणि खास बदल करणार आहे. आता लवकरच YouTube शाॅर्टसाठी शाॅपिंग फीचर सुरु केले जाईल. या फीचरमध्ये तुम्हाला एफिलिएट मार्केटिंग आणि शाॅर्ट्सद्वारे टॅग केलेली उत्पादने खरेदी करण्याची सुविधा मिळेल. या फीचरद्वारे इन्फ्लूएंसर त्यांच्या प्रोडक्टसना शाॅर्ट्स व्हिडिओंमध्ये टॅग करु शकतील, ज्यामुळे व्ह्युव्हर्सना शाॅपिंग करणे सोपे होणार आहे.

( हेही वाचा: …म्हणून आफताबजी नार्को टेस्ट रद्द; नेमकं काय घडलं? )

लवकरच YouTube Shorts ने शाॅपिंगचा आनंद घेता येणार

YouTube च्या नवीन फीचरवरुन असा अंदाज लावता येतो की, प्लॅटफाॅर्म लवकरच ई- काॅमर्स क्षेत्रातही आपला हात आजमवण्यासाठी सज्ज झाला आहे. हे वैशिष्ट्य सध्या US मधील निवडक प्रभावकांसाठी आणले जात आहे. अमेरिका, भारत, ब्राझील, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये या वैशिष्ट्याची चाचणी केली जात आहे. गेल्या आठवड्यातच, लहान व्हिडीओ प्लॅटफाॅर्म टिकटाॅकनेदेखील आपल्या अॅपवर शाॅपिंग प्रोग्रामची चाचणी सुरु केली आहे. आता तुम्हाला लवकरच YouTube Shorts ने शाॅपिंगचा आनंद घेता येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here