Thane जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांत औषधांचा तुटवडा

39
Thane जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांत औषधांचा तुटवडा
Thane जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांत औषधांचा तुटवडा

आरोग्य सेवा उपसंचालक मुंबई मंडळ ठाण्याचे प्रमुख डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा शल्यचिकित्सक सामान्य रुग्णालय ठाणे प्रमुख डॉ. कैलास पवार यांनी आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई व सहसंचालक आरोग्य सेवा आरोग्य भवन मुंबई विभागाला पत्र लिहिले आहे. यामध्ये ठाणे (Thane) जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांत औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याची माहिती आहे. सामान्य जिल्हा रुग्णालय ठाण्यासाठी १२ कोटी, तर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयासाठी २ कोटी, तसेच औषध थकबाकीसाठी ५५ लाखांची मागणी या पत्राद्वारे मागणी केली आहे.

(हेही वाचा – Advocate Academy : नवी मुंबईत होणार देशातील पहिली ॲडवोकेट अकॅडमी आणि संशोधन केंद्र)

शासनाने मोफत उपचाराचा घेतलेला निर्णय व शासकीय अनुदानाअभावी मध्यवर्ती रुग्णालयासह जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात औषधांचा ठणठणाट झाला. त्यामुळे रुग्णांवर विनाऔषध रहाण्याची वेळ आल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. स्थानिक औषध दुकानदारांनी वाढत्या थकबाकीमुळे औषध देण्यास आणि ऑक्सिजन, नायट्रेट आणि स्पिरिट रिफिल करण्यास नकार दिल्याने, मोठा अनर्थ ओढवण्याची शक्यता आहे. या दुकानदारांचे तब्ब्ल ५५ लाखांचे बिल थकले आहे, असे सांगितले जात आहे.

औषध दुकानदारांची थकबाकी वाढली

मध्यवर्ती रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात रोज १५०० रुग्णांची नोंद असून, आंतररुग्णांची संख्याही क्षमतेपेक्षा जास्त आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून होणारा औषधपुरवठा ९० टक्के कमी झाला असून मध्यवर्ती रुग्णालयाने स्थानिक दुकानांकडून खरेदी केलेल्या औषधांची थकबाकी ४० लाखांवर गेली आहे. नऊ लाखांचे ऑक्सिजन, नायट्रेट बिल आहे. दुकानदारांनी थकबाकीचे कारण देऊन ऑक्सिजन, नायट्रेट, स्पिरिट रिफिल देण्यास मनाई केल्याने अनर्थ होण्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली.

काय आहेत कारणे ?
  • रुग्णालयाला रुग्णांनी काढलेल्या केसपेपरमधून महिन्याला ५ ते ६ लाखांचे उत्पन्न मिळत होते. त्यातून स्थानिक दुकानातून औषधांची खरेदी केली जात होती.
  • सरकारच्या मोफत उपचार देण्याच्या निर्णयामुळे हे उत्पन्न बंद झाले आणि अनुदानही मिळत नसल्याने रुग्णालयांची कोंडी झाली आहे. (Thane)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.