धक्कादायक! कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत जे जे रुग्णालयामध्ये औषधांचा तुटवडा!

j j hospital

महाराष्ट्र राज्य संचालित सर जे.जे. रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागामध्ये (OPD) दररोज येणाऱ्या सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी व इतर सर्वसामान्य आजारांवरती औषधोपचार करण्यासाठी आलेल्या रुग्णांना कोरोना महामारी काळापासून ते आजतागायत  मोफत आरोग्य सेवा अंतर्गत औषधे मिळत नाहीत. त्यामुळे नाईलाजाने रुग्णांना जे.जे. रुग्णालया बाहेरील खाजगी मेडिकल दुकानातून औषधे विकत घ्यावी लागत आहेत.

( हेही वाचा : दहावीच्या मुलांसाठी १९ हजार ४०१ नवीन टॅब : प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर )

डॉक्टर तसे रुग्णांना चिठ्ठीही लिहून देत आहेत. त्यामुळे रुग्णांच्या खिशाला नाहक कात्री लागत आहे. त्रास होत आहे. जिथे मोफत औषधे मिळावयास हवी तिथे रुग्णांना पदरचे रुपये खर्च करून खाजगी मेडिकल दुकानातून औषधे खरेदी करावी लागत आहेत. अशी तक्रार रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी जनसेना संस्थेकडे केलेली आहे. तसेच जेजेमध्ये काम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनीसुध्दा खाजगीत  तक्रार केलेली आहे. त्यांनीही याअगोदर जे.जे. प्रशासनाला वेळोवेळी औषधाबद्दल विचारणा केलेली आहे. परंतु जैसे थे परिस्थिती आहे. हा प्रकार सर्व सामान्य गरीब, कष्टकरी, रोजंदारीवर काम करणाऱ्यांना लुबाडण्याचा प्रकार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, असे मत महाराष्ट्र जनसेना सामाजिक संस्थेचे संस्थापक सदस्य दिनेश पवार यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.

( हेही वाचा : कोरोनाला हरवा आणि मिळवा तब्बल 50 लाख रूपये! )

८० लाखांची औषधे वाया

मागे वृत्तपत्रातून आलेल्या बातम्यांमधून जे. जे. रुग्णालयामध्ये २०१८ – १९ ला ८० लाखांची औषधे वाया गेली होती आणि आता सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी सारख्या सामान्य आजारावरच्या औषधांचा तुटवडा भासत आहे.  यात कोणतं गौडबंगाल आहे ते जनसेनेला कळेल का? आज कोरोना महामारी काळातही गोरगरीबांसाठी वेळेवर औषधे उपलब्ध होत नाही ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. असं असताना सुध्दा अजूनही राज्य सरकार आरोग्य मंत्री प्रशासन व जे.जे.प्रशासनाने अजूनही यावर तोडगा काढलेला नाही असे दिसत आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने त्वरित चौकशी करून औषधं तुटवडावर कायमचा तोडगा काढून रुग्णांना जे. जे. मध्येच सर्व आजारांवरची औषधे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी महाराष्ट्र जनसेना सामाजिक संस्थेचे संस्थापक सदस्य दिनेश पवार यांनी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here