राज्यभरात सार्वजनिक बसचा तुटवडा: 1 लाख प्रवाशांमागे फक्त 60 बसेस; ITDP Report मधून ही माहिती आली समोर 

98

महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक वाहतूक म्हणून बस ही महत्त्वाची प्रवासी सेवा आहे. राज्यातील कानाकोपऱ्यात जाण्यासाठी तसेच, शहराला गावासोबत जोडण्यासाठी बस (BUS) हा एक महत्त्वाची सार्वजनिक व्यवस्था आहे. अशामध्ये नुकतेच एका सर्व्हेमध्ये समोर आले की, राज्यात एक लाख प्रवाशांसाठी फक्त 60 बस गाड्या असून राज्यात तब्बल 24 हजार बसगाड्यांचा तुटवडा (Bus shortage) आहे. सार्वजनिक वाहतुकीचा अभ्यास करणारी जागतिक संस्था ‘इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सपोर्टेशन अँड डेव्हलपमेंट पॉलिसी’ने (Institute for Transportation and Development Policy) यांनी अहवालातून असे दिसून आले आहे की, फक्त मुंबईच नाही तर त्याचा महानगर प्रदेश (MMR) आणि राज्यातील उर्वरित शहरी शहरांमध्ये सार्वजनिक वाहतुकीसाठी चालवल्या जाणाऱ्या बस गाड्यांची कमतरता आहे. (ITDP Report)

(हेही वाचा – Sri Ganesh Gaurav Competition-2024 पुरस्कार वितरण सोहळा अत्यंत थाटात आणि उत्साहात पार पडला)

या अहवालानुसार, ५.४ कोटी शहरी भागांतील नागरिकांच्या वाहतूक गरजा पूर्ण करण्यासाठी राज्यातील ४४ शहरांमध्ये किमान २८,८०० बसगाड्यांची आवश्यकता आहे. सध्या राज्यात शहरी भागांत केवळ ८,७०० बसताफा आहे. यातही ३,५०० बस आयुर्मान पूर्ण झाल्याने सेवेतून बाद होण्याच्या उंबरठ्यावर आहेत.

केंद्र सरकारच्या २०१२ मध्ये सादर केलेल्या १२ व्या पंचवार्षिक योजनेच्या शिफारशीनुसार, २ लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असणे आवश्यक आहे. यानुसार राज्यातील ४४ शहरांत ५.४ कोटी लोकसंख्या आहे. ३० शहरांमधील नागरिक सार्वजनिक परिवहन सेवेपासून (Transportation Services) वंचित आहेत. १४ शहरांमधील प्रतिलाख प्रवाशांमागे सरासरी केवळ १५ बस धावत आहेत.

(हेही वाचा – Delhi Assembly Election : मोठ्या पक्षांसाठी लहान पक्ष डोकेदुखी ठरणार)

मुंबईत निम्याहून कमी बस

राज्यात २० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेली अर्थात १ टियर आणि २ टियरमध्ये समावेश होणारी ९ शहरे आहेत. मुंबईत सध्या ३,६०० बस धावत असून, केंद्राच्या निकषानुसार मुंबईसाठी ८,००० आवश्यकता आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.