मालाड आप्पा पाडा ते कांदिवली लोखंडवालाचा मार्ग होणार शॉर्टकट

217

मालाड पूर्व जलाशय टेकडी ते मार्गे कांदिवली लोखंडवाला संकुल दरम्यानच्या १२० फुटी रस्त्याचे काम वनखात्याच्या हद्दीतील ४०० मीटरच्या पट्ट्यात अडकले आहे. वन खात्याच्या परवानगी अभावी हे काम रखडले होते. परंतु पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या निर्देशानुसार हे काम आता मार्गी लागले असून या कामासाठी महापालिकेने निविदा मागवल्या आहेत. त्यामुळे हे काम आता पूर्ण झाल्यास अप्पा पाडा ते कांदिवली लोखंडवाला प्रवास शॉर्टकट्स होणार आहे. त्यामुळे सध्या वाहतूक कोंडीचा जो काही त्रास मालाड आणि कांदिवलीकर सहन करत आहेत, तो त्रास आता कमी होऊन वेळ आणि इंधनाचीही बचत होणार आहे.

आता पश्चिम उपनगराची वाहतूक कोंडी सुटणार

पश्चिम उपनगराची वाहतूक कोंडी आता सुटणार आहे. वनविभागाच्या हद्दीत असलेल्या ४०० मीटरच्या रस्त्याची एनओसी वनविभागाकडे गेली अनेक वर्षे अडकली होती. मालाड पूर्व जलाशय टेकडी ते मार्गे कांदिवली लोखंडवाला संकुल दरम्यानच्या १२० फूटी रस्त्याचे काम पूर्ण झाले होते,मात्र परंतु या भागातील १३०० मीटर रस्त्यांच्या कामापैकी ४०० मीटर रस्त्याचे काम वनखात्याच्या हद्दीत येत होते. मात्र या रस्त्याला वनखात्याचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्याने गेली अनेक वर्षे रस्त्याचे काम लालफितीत अडकले होते.पर्यावरण मंत्री व उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने मालाड पूर्व जलाशय टेकडी ते मार्गे कांदिवली लोखंडवाला संकुल दरम्यानच्या प्रलंबित रस्त्याचे काम मार्गी लागले आहे.

सात वर्षांच्या पाठपुराव्याला अखेर यश

या रस्त्याला वनखात्याचे ना हरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी आणि येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शिवसेना नेते, खासदार गजानन कीर्तिकर यांच्या मार्गर्शनाखाली शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोद, दिंडोशीचे स्थानिक आमदार, माजी महापौर सुनील प्रभू यांनी याप्रकरणी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता.मंत्री आदित्य ठाकरे यांनी याप्रकरणी अलीकडेच संबधित अधिकाऱ्यांची सह्याद्री अतिथी गृहात स्थानिक खासदार गजानन कीर्तिकर व आमदार प्रभू यांच्या समवेत संयुक्त बैठक घेऊन सदर रस्त्याचे काम मार्गी लावा असे आदेश दिले होते. वनखात्यातील जैविक वैविधतेला बांधा न येता त्यांच्या गेल्या सात वर्षांच्या आमदार सुनील प्रभू यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. मुंबई महानगर पालिकेने २ नोव्हेंबर रोजी मालाड जलाशय टेकडी ते आप्पापाडा या वनखात्याच्या जागेतून जाणाऱ्या आणि कांदिवली पूर्व लोखंडवाला कॉम्प्लेक्सला जोडणाऱ्या सदर ३६.६० मीटर लांब आणि १८.३० मीटर डीपी रोडच्या कामाची निविदा काढली आहे.

(हेही वाचा – रझा अकादमीच्या कार्यालयावर पोलिसांची छापेमारी)

आमदार सुनील प्रभू यांच्या प्रयत्नाने हा प्रश्न आता लवकर मार्गी लागणार असून भविष्यात मालाड जलाशय टेकडी ते कांदिवली पूर्व लोखंडवाला दरम्याचे अंतर कमी वेळात पूर्ण होणार असून नागरिकांच्या वेळेची व इंधनाची बचत होणार असल्याची माहिती मुंबईचे उपमहापौर ऍड.सुहास वाडकर, दिंडोशी विधानसभा शिवसेना संघटक विष्णू सावंत व माजी नगरसेवक प्रशांत कदम यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.