जुनी पेन्शन योजना लागू करावी का? काय म्हणते RBI?

284

देशात सध्या जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आंदोलन सुरु झाले असताना आता यावर चक्क रिझर्व्ह बँकेने मत मांडले आहे. जुनी पेन्शन योजना लागू केल्यास तिजोरीवर भार पडेल, त्यामुळे जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन देऊ नका, असे RBI ने म्हटले आहे.

कर्नाटकातही जुनी पेन्शन योजना आणण्याची चर्चा

जुनी पेन्शन योजना लागू केली तर अनेक पटीने खर्च वाढेल, जनतेला आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारांनी आश्वासने दिल्यामुळे देशाच्या तिजोरीवर भार पडणार आहे, असे RBI म्हटले आहे. अलीकडेच राजस्थान, छत्तीसगड आणि पंजाब या राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. तसेच कर्नाटकातही जुनी पेन्शन योजना आणण्याची चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर राज्यांनी नवीन पेन्शन योजना लागू करण्याचा सल्ला दिला आहे. RBI ने ‘स्टेट फायनान्स : अ स्टडी ऑफ बजेट्स ऑफ 2023-24’ हा अहवाल प्रसिद्ध करत राज्यांना इशारा दिला आहे. जर सर्व राज्यांनी जुनी पेन्शन योजना (OPS) परत आणली, तर त्यांच्यावरील आर्थिक भार सुमारे 4.5 पट वाढेल. जुनी पेन्शन योजना (OPS) चा GDP वर नकारात्मक परिणाम होईल. यावरील अतिरिक्त खर्चाचा बोजा 2060 पर्यंत जीडीपीच्या 0.9 टक्क्यांवर पोहोचेल, असेही RBI म्हणाली.

(हेही वाचा China Warns Pakistan: कर्ज लवकर फेडा नाहीतर..चीनने पाकिस्तानला धमकावले; नेमकी काय आहे ‘रणनिती’? वाचा सविस्तर…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.