Veer Savarkar : राहुल गांधी यांच्याविरोधातील दाखल दाव्यात दिरंगाई केल्याने विश्रामबाग पोलिसांना कारणे दाखवा नोटीस

Veer Savarkar : काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी वेळेत तपासणी अहवाल सादर न करणाऱ्या विश्रामबाग पोलिसांना न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली.

191
Veer Savarkar : राहुल गांधी यांच्याविरोधातील दाखल दाव्यात दिरंगाई केल्याने विश्रामबाग पोलिसांना कारणे दाखवा नोटीस
Veer Savarkar : राहुल गांधी यांच्याविरोधातील दाखल दाव्यात दिरंगाई केल्याने विश्रामबाग पोलिसांना कारणे दाखवा नोटीस

काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी वेळेत तपासणी अहवाल सादर न करणाऱ्या विश्रामबाग पोलिसांना न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. २३ फेब्रुवारीच्या आत अहवाल सादर न केल्याने ही नोटीस बजावण्यात आली आहे. (Veer Savarkar)

(हेही वाचा – Manipur : मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त)

पोलिसांकडून मुदतीत अहवाल नाही

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर (Satyaki Savarkar) यांनी याविषयी दावा दाखल केला होता. या प्रकरणी राहुल गांधी हे न्यायालयाच्या कक्षेबाहेर असल्याने दाव्याचा सखोल तपास करून पोलिसांना २३ फेब्रुवारीपूर्वी आपला तपासणी अहवाल न्यायालयात सादर करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांनी दिले होते. मात्र पोलिसांनी न्यायालयाने दिलेल्या मुदतीत अहवाल सादर केला नाही. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणात पोलिसांनी कामात दिरंगाई केल्याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, अशी माहिती सात्यकी सावरकर यांचे वकील ॲड. संग्राम कोल्हटकर यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलतांना दिली.

सात्यकी सावरकर यांनी याबाबतचे सर्व पुरावे व साक्षीदार न्यायालयात सादर केले होते. ते पुरावे व साक्ष गृहीत धरून १९ फेब्रुवारी रोजी या प्रकरणात प्राथमिक सत्यता निदर्शनास आल्यामुळे, तसेच आरोपी न्यायालयाच्या कक्षे बाहेर वास्तव्यास असल्यामुळे या प्रकरणात न्यायालयाने विश्रामबाग पोलिसांना सखोल तपास करण्याचा आदेश दिला होता. मात्र मुदत उलटून ५ मार्चपर्यंत देखील अहवाल सादर न झाल्यामुळे न्यायालयाने नोटिशीची कारवाई केली. या प्रकरणाची पुढील सुनावणी दोन एप्रिलला होणार आहे.

(हेही वाचा – Udhayanidhi Stalin : ड्रग्ज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे उदयनिधी स्टॅलिनपर्यंत)

राहुल गांधी यांच्याकडून वीर सावरकरांचा पुन्हा अवमान

गेल्या वर्षी राहुल गांधी यांनी लंडनमध्ये (London) अनिवासी भारतियांसमोर भाषण केले होते. त्यात त्यांनी डोकलाम आणि सावरकरांचा संदर्भ दिला होता. ते म्हणाले होते की, सावरकर आणि त्यांचे पाच सहा मित्र एका मुस्लिम व्यक्तीला मारत होते. तेव्हा सावरकरांना आनंद होत होता, असे त्यांनी पुस्तकात लिहिले आहे.

तसेच डोकलामचा उल्लेख करीत राहुल गांधी म्हणाले होते की, समोरचा पक्ष कमजोर असेल तर त्याला मारावे आणि जर आपण कमजोर असू तर पळून जावे, असे विधान गांधी यांनी केले होते. या विधानाप्रकरणी सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात पुणे न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे. (Veer Savarkar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.