आफताबने श्रद्धाची हत्या का केली? आरोपपत्रात झाला खुलासा 

धर्मांध आफताब पुनावाला याने श्रद्धा वालकर हिची क्रूरतेने हत्या केली. तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले. त्यामुळे आफताबने हा खून का केला, या प्रश्नाची उकल अखेर पोलिसांनी त्यांच्या आरोपपत्रात केली आहे. श्रद्धा ही नवीन मित्राला भेटायला गेली म्हणून आफताबने श्रद्धाचा खून केला.

काय म्हटलेय आरोपपत्रात?

दिल्ली पोलिसांनी श्रद्धाचा मारेकरी आफताब पुनावाला याच्याविरोधात न्यायालयात ६,६२९ पानांचे आरोपपत्र सादर केले आहे. या आरोपपत्रात पोलिसांनी आफताबने श्रद्धाची हत्या कशी केली आणि तिच्या मृतदेहाची क्रूरपणे विल्हेवाट कशी लावली, याचा हिशेब मांडला. पोलिसांनी आफताबच्या विरोधात सात भक्कम पुरावे सादर केले आहेत. आता याप्रकरणाची जलद पद्धतीने सुनावणी होऊन आफताब पुनावाला फासावर लटकणार का, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. आफताब आणि श्रद्धा हे १७ मे या तारखेला पहिल्यांदा भेटले होते. या तारखेची वर्षपूर्ती १७ मे २०२२ रोजी आफताब आणि श्रद्धा यांच्यात कडाक्याचे भांडण झाले होते. या भांडणानंतर श्रद्धा डेटिंग अॅपवर ओळख झालेल्या आपल्या एका मित्राच्या घरी निघून गेली. तिकडून परतल्यानंतर आफताब आणि श्रद्धा यांच्यात पुन्हा भांडण सुरु झाले. हे भांडण इतके विकोपाला गेले की, आफताबने श्रद्धाची गळा दाबून हत्या केली. आफताबने पूर्वनियोजित कटानुसार श्रद्धा वालकर हिला ठार मारले. दिल्ली पोलिसांनी आफताब पुनावाला याच्यावर हत्या आणि पुरावे मिटवण्याचे मुख्य आरोप ठेवले आहेत.

(हेही वाचा ब्रिटनच्या संसदेत मोदींची बदनामी; पंतप्रधान सुनक यांनी पाक वंशाच्या खासदाराला सुनावले)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here