Shravan 2022: भीमाशंकरला जाण्यासाठी PMPML कडून विशेष सेवा

134

नुकताच श्रावण महिना सुरू झाला असून श्रद्धाळू भाविक महादेवाच्या दर्शनासाठी जात असतात. देशात १२ ज्योर्तिलिंगापैकी ६ वे ज्योर्तिलिंग हे भीमाशंकर येथे आहे. त्यामुळे अनेक भाविक भीमाशंकरला दर्शनासाठी जात असतात. या सगळ्या भाविकांसाठी पुण्यातून पीएमएमएलकडून विशेष सेवा देण्यात येत आहे. पीएमएमएलकडून श्रावण महिन्यातील प्रत्येक रविवार आणि सोमवारी भीमाशंकर येथील पार्किंग ते भीमाशंकर मंदिरापर्यंत २४ तास विशेष शटल सेवा देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

(हेही वाचा – ED पुन्हा अ‍ॅक्शनमोडमध्ये! नॅशनल हेराल्डच्या कार्यालयावर छापा)

कधी असणार ही सेवा उपलब्ध

मिळालेल्या माहितीनुसार, पीएमएमएलकडून देण्यात येत असलेले २४ तास विशेष शटल सेवेकरता निगडी डेपोतील डिझेलवर धावणाऱ्या १२ मिडी बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ७ आणि ८ जुलै, १४, १५, १६ जुलै यासह २१ आणि २२ जुलै रोजी म्हणजेच श्रावण महिन्यातील प्रत्येक रविवार आणि सोमवारी ही शटल बससेवा भाविकांसाठी २४ तास उपलब्ध असणार आहे. १४, १५ आणि १६ जुलै रोजी सलग असल्याने सुट्टी रविवार, सोमवार व मंगळवारी देखील ही शटल सेवा सुरू ठेवण्यात येणार आहे.

निगडी डेपोतून श्रावण महिन्यातील प्रत्येक रविवारी पहाटे ४ वाजता या बसेस निघणार असून सोमवारी रात्री उशिरा या सर्व बसेस निगडी डेपोत परत येतील. मिडी बसेससाठी लागणारे डिझेल भीमाशंकर येथेच सर्व्हिस व्हॅन मधून उपलब्ध करून देणार आहे. तर या श्रावण महिन्यात दर रविवार व सोमवारी भीमाशंकर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांनी भीमाशंकर येथील पार्किग ते भीमाशंकर मंदिरपर्यंत पीएमपीएमएलच्या या शटल बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपीएमएलकडून करण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.