यंदा अधिक मास श्रावण महिन्याला जोडून आल्याने भाविकांना दुहेरी पर्वणीचा लाभ घेता आला. १८ जुलैपासून अधिकमासाला प्रारंभ झाला होता. बुधवार, १६ ऑगस्ट रोजी अधिकमासाची समाप्ती झाली. आता निज श्रावण मास गुरुवार, १७ ऑगस्टपासून सुरु झाला असून १५ सप्टेंबरपर्यंत राहील. या अधिकमासामध्ये शिवभक्तांना ४ ऐवजी ८ श्रावणी सोमवार व्रत करण्याचे भाग्य लाभले.
अधिकमासाला अत्यंत शुभ मानले गेले असले तरी या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. शिवाय हा मास पुरुषोत्तम मास म्हणूनही ओळखला जातो. कारण या काळात भगवान विष्णूच्या पूजेला विशेष महत्व देण्यात आले आहे. श्रावण मास हा खासकरुन भगवान शंकरला समर्पित असतो. श्रावण मास हा महादेवाला अत्यंत प्रिय असून या काळात श्रावणी सोमवारचे मनोभावे व्रत केल्याने इच्छित फलप्राप्ती होते. तसेच भोळ्या शंकराची कृपादृष्टी भाविकांवर राहते व मनोकामनाही पूर्ण होतात.
(हेही वाचा – CM Eknath Shinde : हात गमावलेल्या चिमुकल्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून पाच लाखांची मदत)
अशी करा घरीच शिवआराधना –
या श्रावण मासात भगवान शंकराला जलाभिषेक करण्याची परंपरा आहे. शिवलिंगावर पाणी टाकून ‘ओम नमः शिवाय’ मंत्राचा जप करू शकता. तसेच शिवलिंगावर चंदन, हार, फुले, बेलाची पाने, धोत्रा, रुईची फुले, अबीर, गुलाल, अत्तर, जानवे, वस्त्र इत्यादी पुजेची सामग्री अर्पण करावी. पुराणकथांमध्ये देव आणि दानवांमध्ये झालेल्या समुद्रमंथनातून सर्व प्रथम हलाहल म्हणजे विष निघाले. हे हलाहल भगवान शंकराने प्राशन केल्याने त्यांच्या शरीरातील उष्णता खूप वाढली. उष्णता आणि विषाचा प्रभाव दूर करण्यासाठी शिवाला बिव्ल पत्रे म्हणजेच बेलाची पाने खाऊ घालण्यात आली आणि डोक्यावर थंड पाण्याची धार सोडण्यात आली. याच कारणास्तव शिवलिंगावर विशेषत: चंदन, दूध, दही, गंगाजल यांसारख्या थंड वस्तू अर्पण करण्याची परंपरा पूर्वापार चालत आली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community