Shree Siddhivinayak Mandir Trust: श्रीसिद्धिविनायक न्यासाकडून महत्त्वाचे निर्णय, भाविकांना घेता येणार सुरळीत दर्शन

वाहतूक पोलिसांच्या वाहतूक मार्गातही बदल होणार आहेत.

240
Shree Siddhivinayak Mandir Trust: श्रीसिद्धिविनायक न्यासाकडून महत्त्वाचे निर्णय, भाविकांना घेता येणार सुरळीत दर्शन
Shree Siddhivinayak Mandir Trust: श्रीसिद्धिविनायक न्यासाकडून महत्त्वाचे निर्णय, भाविकांना घेता येणार सुरळीत दर्शन

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीसिद्धिविनायक मंदिरात भाविकांना (Shree Siddhivinayak Ganapati Mandir Trust) शांततेने आणि सहजपणे दर्शन घेता यावे, याकरिता काही उपापयोजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मंदिर न्यासाकडून रुग्णांना केल्या जाणाऱ्या आर्थिक साहाय्याबाबतही बदल होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ही योजना पुढे आली आहे.

श्रीसिद्धिविनायक मंदिर न्यासाचे नवनियुक्त अध्यक्ष सदा सरवणकर यांनी सांगितले की, सध्या प्रत्येक गरजू रुग्णाला न्यासाकडून एकरकमी २५ हजार रुपयांची वैद्यकीय मदत केली जाते. २००९ सालापासून ही रक्कम तेवढीच आहे. महागाई आणि वैद्यकीय उपचारांचा वाढता खर्च लक्षात घेता ही रक्कम ५० हजार केली जाणार आहे. ‘कर्करोगावरील उपचार आणि विविध आजारांचे स्वरुप लक्षात घेता उपचारांसाठी अधिक मदतीची गरज भासू शकते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ही योजना पुढे आली असून गंभीर स्वरुपाच्या उपचारांसाठी मदतीची रक्कम २ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. मंदिराच्या दानपेटीत येणारी रक्कम ही समाजाची आणि भाविकांची आहे. त्यामुळे ती सढळ हस्ते भाविकांच्या आरोग्यासाठी वापरणे आणि तात्काळ मदत उपलब्ध करून देण्यावर आमचा भर आहे ‘, अशी माहिती सदा सरवणकर यांनी दिली आहे.

(हेही वाचा – Deepak Kesarkar : शाळा व शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक)

धक्काबुक्की होऊ नये यासाठी…
श्रीसिद्धिविनायकाचे दर्शन घेताना धक्काबुक्की होऊ नये यासाठी विशेष आराखडाही न्यासातर्फे आखण्यात येणार आहे. मंदिर परिसरातील दोन्ही प्रवेशाच्या मार्गावर लवकरात लवकर सुसज्ज आणि रेखीव प्रवेशद्वार उभारण्याचे नियोजन आहे. त्यासाठी निविदाही मंजूर झाल्या आहेत. याशिवाय मंदिर ते दादर रेल्वे स्थानक आणि प्रभादेवी रेल्वे स्थानक अशी फिरती बेस्ट बससेवा लवकरच सुरू होणार आहे. वाहतूक पोलिसांच्या वाहतूक मार्गातही बदल होणार आहेत. भाविकांना सुरळीत गणेश दर्शन घेता यावे, यावर भर राहणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.