श्रीमलंग गडावर श्रीमलंग नाथांचा जयघोष! हिंदूंनी बिनधास्त केली आरती

193

कल्याण जवळील श्रीमलंग गडावर मोठ्या उत्साहात प्रत्येक पौर्णिमा साजरी केली जात असते. सोमवारी शांक भरी पौर्णिमा उत्सवा निमित्त कल्याणमधील श्री स्वामी समर्थ मठाचे धारकरी आणि मठाचे मठाधिश्वर श्री मोडक महाराज यांनी मलंगडावर प्रदक्षिणा करत श्रीमलंग नाथांचा जयघोष केला.

प्रथा-परंपरेने साजरी केली पौर्णिमा

श्रीमलंग गडावर प्रत्येक पौर्णिमेला अनन्य साधारण महत्व आहे. प्रत्येक पौर्णिमा ही प्रथा परंपरा पद्धतीने साजरी केली जाते. शांक भरी पौर्णिमा उत्सवाच्या निमित्त कल्याणमधील श्री स्वामी समर्थ मठाचे धारकरी हे दरवर्षी मोठ्या संख्येने मलंगगडावर पौर्णिमा उत्सवानिमित्त येत असतात. मात्र यंदा कोरोना महामारीमुळे निवडक धारकरी आणि विश्व हिंदू परिषदेचे कल्याण जिल्हा सुरक्षा प्रमुख राजेश गायकर, सुरेंद्र भालेकर यांच्या उपस्थितीत शांक भरी पौर्णिमा साजरी करण्यात आली आहे.

(हेही वाचा श्री मलंग गड मुसलमानांचे नव्हे, हिंदूंचे श्रद्धास्थान! काय आहे इतिहास?)

श्रीमलंग गडाचा काय आहे इतिहास?

श्रीमलंग गडावर नाथपंथाची दीक्षा गादी आहे. तेथे हिंदू धर्मीय दर्शनासाठी जातात, होळी पौर्णिमेला आरती करतात, या मुख्य स्थानापासून अलीकडे दोन समाधी आहेत. त्या जालिंदरनाथ आणि कानिफनाथ यांच्या आहेत. तर याच गडावर नाथपंथाचे श्री मच्छिन्द्रनाथ आणि गोरक्षनाथ यांचे मंदिर आहे, तसेच अन्य ५ नाथांची समाधीही आहे. याच गडावर श्री गणेश, श्री हनुमान आणि देवीचे मंदिरही आहे. सध्या ही दीक्षा गादी आणि दोन समाधी स्थळे यांवर मुसलमानांनी अतिक्रमण केले आहे. पेशव्यांनी या ठिकणी पूजापाठ करण्याचा मान कोकणस्थ चित्पावन ब्राह्मण केतकर घराण्याकडे दिला. पूर्वापार पिढ्यानपिढ्या हा वारसा केतकर घराण्याच्या पुढच्या पुढच्या पिढीकडे हस्तांतरित होत आहे. आजही या ठिकाणी सर्व धार्मिक विधी हिंदू धर्माप्रमाणे होतात. धर्मवीर स्व. आनंद दिघे यांनाही याच दीक्षा गादी येथे नाथपंथाची दीक्षा देण्यात आली.

(हेही वाचा श्री मलंग गडावर महाआरतीत मुसलमानांचा हैदोस!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.