श्रीरामोत्सव-२०२४ हा जगातील सर्वात मोठा सांस्कृतिक महोत्सव होणार आहे. विश्व हिंदू परिषद आणि आर. एस. एस. ने प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात जनतेला सहभागी करून घेण्यासाठी ‘मास्टर प्लॅन’ तयार केला आहे. विहिंप १ जानेवारी ते १५ जानेवारी या कालावधीत १५ दिवसांची देशव्यापी मोहीम सुरू करणार आहे.
या काळात १२ कोटी कुटुंबांमधील ६० कोटी लोकांना जन्मभूमीवर पूजा केल्या जाणाऱ्या भगवान राम आणि अक्षत (तांदूळ) यांचे चित्र दिले जाईल आणि २२ जानेवारीचा उत्सव, भजन आणि भोजन याकरिता एकत्रितरित्या नागरिकांना आमंत्रित करण्यात आले आहे.
(हेही वाचा – Prabhakar Bhumkar : मनोहर जोशींना राजकारणाचे धडे देणारे निष्ठावंत शिवसैनिक प्रभाकर भूमकर यांचे निधन )
भगवान श्रीरामाच्या ३ पैकी २ मूर्ती तयार आहेत. म्हैसूरच्या अरुण योगीराज यांनी ६ महिन्यांत शाळीग्राम दगडापासून मूर्ती तयार केली आहे. ती ट्र्स्टकडे सुपूर्द केली आहे. योगीराज यांच्या म्हणण्यानुसार, ट्रस्टने मूर्तीला सोने आणि हिरे जडवलेल्या धनुष्य आणि बाणांनी सजवण्याची कल्पना असून यामुळे मूर्तीची दिव्यता वाढेल, असे त्यांचे म्हणणे आहे.
प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण…
देशातील ५ लाख गावांमधील ३० कोटी लोकांना जोडण्यासाठी विहिंपने २२ जानेवारी रोजी देशातील ५ लाख गावांमधील मंदिरे, धार्मिक किंवा सार्वजनिक ठिकाणी एक कार्यक्रम आयोजित करण्याची योजना आखली आहे. यामध्ये प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहता येईल. यावेळी गावातील सर्व रहिवाशांना बोलावले जाईल, जेणेकरून देशाचा प्रत्येक कोपरा राममय होईल. ६० कोटी लोकांशी थेट संपर्क असल्याचा विहिंपने दावा केला आहे. त्याच वेळी, ५ लाख गावांमधील सुमारे ३० कोटी लोकांना जोडले जाईल. अशा प्रकारे प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये सामील होणाऱ्या लोकांची अंदाजे संख्या ९० कोटी असेल, अशी माहिती मंदिर ट्रस्टकडून देण्यात येत आहे.
राम लल्लाला शरयू नदीच्या पाण्याचा अभिषेक
प्राणप्रतिष्ठा सोहळा १६ जानेवारीपासून सुरू होईल आणि २४ जानेवारीपर्यंत सुरू राहील. प्राणप्रतिष्ठेपूर्वी शरयू नदीची पूजा केली जाईल आणि राम लल्लाचा शरयू नदीच्या पाण्याने अभिषेक केला जाईल. त्यानंतर राम लल्लाची मूर्ती एक दिवस पाणी, फळे आणि अन्ना मध्ये ठेवली जाईल. ९ दिवसांच्या उत्सवासाठी श्रीराम यंत्र बसवले जाईल. हा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर त्याचे शरयू नदीत विसर्जन केले जाईल. या समारंभात हवनासाठी ९ कुंड तयार केले जातील. हा संपूर्ण कार्यक्रम काशीच्या विद्वानांच्या देखरेखीखाली असेल.
(हेही पहा – Google Job Cuts : गुगलमध्ये पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांवर नोकर कपातीचे संकट?)
जगातील विविध देशांमधून १०० विशेष रामभक्तांना आमंत्रण…
राम मंदिर ट्रस्टचे सदस्य परमेश्वर चौपाल म्हणाले की, या सोहळ्यासाठी जगातील विविध देशांमधून सुमारे १०० विशेष राम भक्तांना आमंत्रित केले जात आहे. याशिवाय देशभरातील संत आणि राम भक्तांसह ७ हजार लोकांनाही आमंत्रित केले जात आहे. २२ जानेवारी रोजी होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण पंतप्रधानांना पाठवण्यात आले आहे.” देशभरातील ४ लाख ग्रामीण मंदिरांमध्ये साजरा केला जाईल. या मंदिरांमध्ये, रामनाम संकीर्तन आणि कोणत्याही एका मंत्राच्या जपासह मुख्य उत्सवात आरती आणि प्रसाद वितरण केले जाईल. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणही केले जाईल. यामुळे कोट्यवधी भाविकांना हा ऐतिहासिक क्षण प्रत्यक्ष पाहणे शक्य होईल.
प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त
अयोध्येत राम लल्लाचा अभिषेक केवळ १ मिनिट आणि २४ सेकंदात होणार आहे. काशीच्या पंडितांनी हा मुहूर्त ठरवला आहे. द्रविड बंधू पंडित गणेश्वर शास्त्री द्रविड आणि पंडित विश्वेश्वर शास्त्री यांनी सांगितले की, २२ जानेवारीला मूळ मुहूर्त १२.२९ मिनिटे ८ सेकंदांचा असेल, जो १२.३० मिनिटे ३२ सेकंदांपर्यंत असेल. म्हणजेच, प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त १ मिनिट आणि २४ सेकंदांचा असेल.”
हेही पहा –
Join Our WhatsApp Community