Shri Trimbakeshwar Temple : श्री त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरण : मुसलमानांचा सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; मंदिर प्रशासनाचे पत्र

मुसलमानांचा मंदिरात घुसण्याचा प्रयत्न हा सामाजिक सलोखा बिघडवण्यासाठी होता, असा आरोप केला आहे.

293

श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात मुसलमानांनी स्थानिक संदल निमित्ताने काढलेल्या मिरवणुकीच्या वेळी मंदिरात जबरदस्तीने आत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवले आणि तेव्हा वाद निर्माण झाला. यानंतर या विषयावर राज्यभर चर्चा सुरू झाली. मंदिर प्रशासनाने तात्काळ पोलिसांना पत्र लिहिले. ज्यामध्ये मुसलमानांचा मंदिरात घुसण्याचा प्रयत्न हा सामाजिक सलोखा बिघडवण्यासाठी होता, असा आरोप केला आहे.

काय म्हटले मंदिर प्रशासनाने पत्रात?

१३ मे रोजी रात्री सुमारे ९.४१ मिनिटांच्या दरम्यान श्री त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर महाद्वार येथे स्थानिक संदल निमित्त निघालेल्या मिरवणुकीतील काही इतर धर्मिय व्यक्तींनी उत्तर महाद्वार येथून श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न वजा हट्ट केला असता या ठिकाणी नियुक्त असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा रक्षकांनी या व्यक्तींना मज्जाव करुन त्यांना अडवले. वास्तविक श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात घटनेप्रमाणे दर्शनाचे अधिकार हे हिंदु धर्मातील व्यक्तींना देण्यात आलेले आहे. या प्रकारामुळे सामाजिक सलोख्यास तेढ निर्माण होण्याचे प्रयत्न होत असल्याचे आम्ही सदर पत्राद्वारे आपल्या निर्दशनास आणून देऊ इच्छितो. तरी श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाच्या सुचनान्वये आपल्या प्रकरणाचा योग्य तो तपास करुन संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना उद्भवणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी विनंती त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याला दिलेल्या पत्रात केली आहे.

(हेही वाचा The Kerala Story : ‘लव्ह जिहाद’विषयी हिंदू जागृत होईल या भीतीने ‘द केरळ स्टोरी’ला विरोध)

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न

याविषयावर ब्राह्मण महासंघानेही पोलिसांना पत्र दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, श्री त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर महादरवाजा येथे स्थानिक संदल निमित्त निघालेल्या मिरवणुकीतील काही इतर धर्मिय व्यक्तींनी उत्तर महादरवाजा येथून समस्त हिंदू धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट अत्यंत गंभीर असून वरील कृत्यामुळे भारतातील समस्त हिंदूंच्या भावना दुखावल्यामुळे जिल्ह्यात, राज्यात आणि देशात कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, सदर घडलेल्या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधित कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणा-यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा संघटनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल. असे प्रकार भविष्यात होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे ब्राह्मण महासंघाने पत्रात म्हटले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.