भागोजीशेठ कीर स्मृती समितीद्वारे हिंदू धर्मरक्षक श्रीमान भागोजीशेठ कीर (Bhagojisheth Keer) यांच्या जयंतीसोहळ्यानिमित्त दि. २६ फेब्रुवारी रोजी शोभायात्रा आणि अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. बेंगाल केमिकल, सेंच्युरी बाजार ते भागोजीशेठ कीर स्मृती स्थळ, दादर चौपाटी याठिकाणापर्यंत सायंकाळी ४.३० वाजता शोभायात्रा निघणार आहे. हिंदू धर्मरक्षक भागोजीशेठ कीर यांचा जन्म ०४ मार्च १८६७ रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी झाला. त्यामुळेच महाशिवरात्रीचे औचित्य साधून या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
( हेही वाचा : ‘विद्या – सपनो की उडान’ डेहराडूनमध्ये Hindi Film चा प्रीमियर)
भागोजीशेठ कीर (Bhagojisheth Keer) यांच्यामुळे मुंबईतील (Mumbai) हिंदू (Hindu) हा हिंदू म्हणून आपले अस्तित्व टिकवू शकला. त्यामुळेच भागोजीशेठ कीर हे हिंदू धर्मरक्षक कसे होते? हे अभिवादन सभेत लोकांना सांगण्यात येईल. भागोजीशेठ कीर (Bhagojisheth Keer) यांचा दडलेला इतिहास, स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेले कार्य लोकांसमोर आणण्यासाठी हा प्रयत्न भागोजीशेठ कीर स्मृती समितीद्वारे केला जात आहे, अशी माहिती प्रमुख मार्गदर्शक नविनचंद्र बांदिवडेकर (Navinchandra Bandivadekar) यांनी दिली.
यंदा शोभायात्रेचे १८ वे वर्ष असून गेल्या १७ वर्षांपासून अव्याहतपणे हिंदू धर्मरक्षक श्रीमान भागोजीशेठ कीर यांच्या जयंतीसोहळ्यानिमित्त शोभायात्रेचे आयोजन केले जाते. या शोभायात्रेनंतर भागोजीशेठ कीर स्मृती स्थळावरील भागोजीशेठ कीर यांच्या प्रतिमेला वंदन केले जाणार आहे. त्यानंतर अभिवादन सभा सुरु होईल. या अभिवादन सभेला उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत, स्थानिक आमदार महेश सावंत, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू तथा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर (Ranjit Savarkar ), भागोजीशेठ कीर (Bhagojisheth Keer) यांचे वंशज अंकुर कीर, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पत्रकारांना माहिती देताना प्रमुख मार्गदर्शक नविनचंद्र बांदिवडेकर (Navinchandra Bandivadekar) म्हणाले की, हिंदू धर्मरक्षक श्रीमान भागोजीशेठ कीर यांच्या जयंतीसोहळ्याला मागील वर्षी मुंबईचे माजी पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांचे सहकार्य लाभले. त्यांच्या नेतृत्वामुळे हिंदू धर्मरक्षक भागोजीशेठ कीर (Bhagojisheth Keer) यांच्या स्मारकाला जागा मिळाली. तसेच स्मारकासाठी २० कोटींचा निधी महाराष्ट्र शासनाकडून मिळाले आहे, अशी माहिती बांदिवडेकर यांनी दिली.
हिंदू धर्मरक्षक भागोजी कीर यांच्याविषयी
हिंदू धर्मरक्षक भागोजीशेठ यांनी रत्नागिरीच्या विठ्ठल मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कल्पनेतले पतितपावन मंदिर स्वखर्चाने बांधून दिले. दि. २२ फेब्रुवारी १९३१ला हे मंदिर बांधून सर्वांसाठी खुले झालं. अशाप्रकारे सामाजिक क्रांतीत हिंदू धर्मरक्षक भागोजी कीरांनी (Bhagojisheth Keer) हातभार लावला.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community